'Ponniyin Selvan' Actor Chiyaan Vikram admitted in hospital Google
मनोरंजन

'अपरिचित' फेम अभिनेता विक्रमला हृदयविकाराचा झटका!

विक्रमला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला हॉस्टिपटलमध्ये दाखल केलं आहे.

प्रणाली मोरे

ऐश्वर्याच्या 'Ponniyin Selvan 1' मधील तामिळ अभिनेता चियान विक्रमला(Chiyaan Vikram) चेन्नईच्या कावेरी हॉस्टिपटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विक्रमच्या प्रवक्त्यानं माहिती दिली आहे की,अभिनेत्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. चियान विक्रम हा मणिरत्नमचा पीरियड ड्रामा 'Ponniyin Selvan 1' मध्ये महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. आज सिनेमाच्या पोस्टर लॉंच सोहळ्यातही तो उपस्थित राहणार होता. पण तब्येत अचानक बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.('Ponniyin Selvan' Actor Chiyaan Vikram admitted in hospital)

अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्वरित त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. ७ जुलै रोजी त्याची एंजियोप्लास्टी झाली आहे. हॉस्पिटलने अद्याप त्याच्या प्रकृती संदर्भात कोणतीही अपडेट समोर आणलेली नाही. मात्र, हॉस्पिटलमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे.

पीरियड ड्रामा 'Ponniyin Selvan1' मध्ये मुख्य भूमिकांमधील एक भूमिका चियान विक्रमने साकारलेली आहे. मणिरत्नमने या सिनेमाला लिहिलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे. विक्रमला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असले तरी सिनेमाच्या टीझर लॉंच कार्यक्रमात काही बदल केल्याची माहिती नाही. विक्रमला शेवटचं 'महान' सिनेमात पाहिलं होतं. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला होता.

चियान विक्रमचा 'पेन्नियन सेलवन1' लवकरच रिलीजच्या वाटेवर आहे. सिनेमाचा पहिला भाग ३० सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ७ जुलैला चियान विक्रमनं आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्वरित त्याला कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. तिथे पोहोचल्यानंतर त्याला हृद्यविकाराचा झटका आल्याचं कळलं. आणि त्यानंतर त्याची एंजियोप्लास्टी करण्यात आली, त्याची प्रकृती आता स्थिर असून आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. लवकरच मेडिकल बुलेटिनही त्याच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी जारी केलं जाईल असं बोललं जात आहे.

विक्रमने 'पेन्नियनच्या सेलवन1' च्या टीमला टीझर लॉंचच्या दिवशी उपस्थित राहू शकत नाही असं कळवलं आहे. काही दिवस आराम केल्यानंतर विक्रम पुन्हा आपल्या आगामी 'कोबरा' सिनेमाच्या ऑडिओ लॉंचमध्ये मात्र सामिल होणार असल्याचं बोललं जात आहे. हा ऑडिओ लॉंच कार्यक्रम ११ जुलै रोजी आयोजित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT