Pooja Bhatt Aaliya Siddiqui Bigg boss ott 2 marriage  esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT : 'लग्न माझंही मोडलयं तेव्हा तू जास्त शहाणपणा नको करु'! आलियाला पूजानं झापलं

प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पुजा भट्टनं नवाझुद्दीनच्या पत्नीला आलियाला चांगलेच झापले आहे.

युगंधर ताजणे

Pooja Bhatt Aaliya Siddiqui Bigg boss ott 2 marraige : सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी २ मधील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापलेलं दिसतंय. त्याचे कारण त्यात सहभागी झालेले एकापेक्षा एक असे तापट सेलिब्रेटी.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा शो कमालीचा लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पुजा भट्टनं नवाझुद्दीनच्या पत्नीला आलियाला चांगलेच झापले आहे. त्याचे कारण आलियानं गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाविषयीच्या वेगवेगळ्या चर्चांना सोशलाईज केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. त्यातून ती अनेकांचे लक्ष वेधून घेते आहे. अशा कार्यक्रमांमध्ये ते करणे चूकीचे आहे. असं पुजानं म्हटले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

आलिया ही पुजाच्या विरोधात काही बोलत होती. हे जेव्हा पुजाला कळले तेव्हा तिनं तिची चांगलीच खरडपट्टी काढली. तू पहिल्यांदा तुझ्या संसारातील गोष्टींना सार्वजनिक थांबव, तुझा शहाणपणा बंद कर, जगात तुच एकटी अशी नाही की, तुझेच लग्न मोडले आहे. माझेही लग्न मोडले आहे. तेव्हा कशावरुनही भांडवलं करणं थांबव. अशा प्रकारची प्रतिक्रिया पुजानं दिली आहे.

त्या खेळामध्ये प्रत्येक जण आणखी दुसऱ्या कुणाला नॉमिनेट करण्यासाठी तयार आहे. अशावेळी पुजाला जेव्हा तू कुणाला नॉमिनेट करशील असे विचारले तर तिनं आलिया सिद्धिकीचे नाव सांगितले. त्याचे कारण म्हणजे, मी तिच्या व्यक्तिमत्वावरुन खूपच गोंधळलेली आहे. एका आठवड्यापासून मी तिच्याविषयी खूपच गोंधळलेली आहे. मी तिचे जे व्यक्तिमत्व पाहिले आहे ते खूपच घाबरवून टाकणारे आहे. असे पुजानं म्हटले आहे.

माझं लग्नपण मोडलंय....

पुज भट्ट एवढचं बोलून काही थांबलेली नाही. तिनं पुढे म्हटलं की, आलिया दरवेळी त्याच त्याच गोष्टी सांगून लक्ष वेधून घेते आहे. त्यातून ती सहानुभूती मिळवते आहे. अशावेळी मला तिला सांगायचे आहे की, माझेही लग्न मोडले आहे. मग मी काय त्याच गोष्टीवरुन बोलत राहू का, आपण कोण आहोत, काय करतो आहोत याचाही विचार व्हायला हवा. लोकांना तुमच्या बोलण्यात तथ्यता जाणवली नाही तर ते तुम्हाला स्विकारणार नाहीत.

केवळ माझीच नाहीतर कित्येक महिलांची लग्नं मोडली आहेत. प्रत्येकीची कारणं वेगळी आहेत. म्हणून त्या काही रडत बसतात का, आपण आपल्या अडचणींचा इतका बाऊ का करतो. त्याच्यावरुन आपल्याला लोकांनी सिंम्पथी द्यावी असे वाटत असते. लोकांनी आपल्याला त्यावेळी मदत नाही केली तर मग त्यांच्यावर आपण चिडतो. हे चुकीचे आहे. अशीही प्रतिक्रिया पुजानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT