घटस्फोट नाट्यानंतर नवाझुद्दिनच्या पत्नीच्या आयुष्यात आला मिस्ट्री मॅन.. 'या' व्यक्तीला करतेय डेट Aaliya Siddiqui about her Mystry Man | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaliya Siddiqui about her Mystry Man

Aaliya Siddiqui: घटस्फोट नाट्यानंतर नवाझुद्दिनच्या पत्नीच्या आयुष्यात आला मिस्ट्री मॅन.. 'या' व्यक्तीला करतेय डेट

Aaliya Siddiqui about her Mystry Man: नवाझुद्दिन सिद्दिकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यातील नात्याचा लवकरच दी एन्ड होत आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. कधी आलियानं नवाझुद्दिनवर आरोप केले तर कधी नवाझुद्दिननं पत्नीच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देत अनेक सवाल केले. दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि लवकरच दोघे विभक्त होतील. असं असलं तरी दोघे मिळून आपली मुलं शोरा आणि यानी यांची देखभाल करणार आहेत.

घटस्फोटाच्या मोठ्या नाट्यानंतर आता आलियानं एका व्यक्तीसोबत आपला फोटो शेअर केला आणि नकळत इशाऱ्यांमध्ये आपलं प्रेमही व्यक्त केलं आहे. आलियानं इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे, 'ज्या नात्याला मी आपलं समजत होते त्यातून बाहेर पडायला मला १९ वर्ष लागली. पण माझ्या आयुष्यात माझ्या मुलांप्रती माझं प्रथम कर्तव्य असणार आहे,आणि कायम राहील'.

पोस्टमध्ये पुढे आलियानं आपल्या नात्याविषयी बातचीत केली आहे. तिनं लिहिलं आहे की,''काही नाती अशी असतात जे मैत्रीपेक्षा जवळची असतात आपल्यासाठी आणि हे नातं तेच नातं आहे. मी या नात्यात खूप खूश आहे. मी माझा हा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करतेय.मला आनंदी राहण्याचा काही हक्क नाही का?''

आपल्या या नवीन नात्याविषयी आलियानं एका मुलाखतीत सांगितलं की, तिनं आयुष्यात आता पुढे जायचं ठरवलं आहे. तिचं हे नातं मैत्रीपेक्षा खूपकाही आहे.

आलिया पुढे म्हणाली,''असं नाहीय की आमच्यात कोणतीच कमिटमेंट नाहीय. माझं स्वतःचं आयुष्य आहे,ज्याला माझ्या मुलांसोबत मला जगायचं आहे. त्यांना कोणतीही अडचण येईल असं काम मला करायचं नाही''.

आलिया म्हणाली की,''दोघांच्या मध्ये खूप आदरयुक्त नातं आहे. काही काळ जाऊ दे. तुम्ही एखादी चांगली गोष्ट केलीत तरी लोक तुम्हाला वाईट बोलतील''.

आपल्या आयुष्यात आलेल्या त्या मिस्ट्री मॅनचं आलियानं तोंडभरून कौतूक केलं. त्याला खूप चांगल्या मनाचा माणूस म्हणून संबोधलं.

ती म्हणाली,''त्याच्या समजूतदारपणानं मला त्याचा ओढा लावला. फक्त पैशानेच आनंद मिळत नाही,तर चांगल्या माणसाचा सहवास तो आनंद तुम्हाला देतो. तो माझा खूप आदर करतो''.

आलियानं सांगितल्याप्रमाणे तिचा मिस्ट्री मॅन इटली येथे राहतो आणि त्याची भेट दुबईत झाली. खूप दिवसांपासून त्यांच्यात छान मैत्री आहे आणि त्याला ओळखण्यासाठी तिला थोडा वेळ लागला असं देखील आलिया म्हणाली. अद्याप आलियानं मिस्ट्री मॅनच्या नावाचा खुलासा केलेला नाही.