Pooja Hegde sing marathi bhajan ughad daar deva in chala hawa yeu dya zee marathi for circus promotion sakal
मनोरंजन

Pooja Hegde: धक्का बसेल.. पण बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडेने गायलं मराठी भक्तीगीत..

अभिनेत्री पूजा हेगडेने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मराठी गाणं गाऊन प्रेक्षकांना वेड लावलं.

नीलेश अडसूळ

pooja hegde: बॉलीवुड आणि टॉलीवुड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या भलतीच चर्चेत आली आहे. मध्यंतरी ती सलमान सोबत डेट करत असल्याच्या चर्चा उठल्या होत्या. तर आता तिचा 'सर्कस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अत्यंत तडगी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूजा, रणवीर सिंग आणि संपूर्ण टीम सर्वत्र भेट आहेत. याच निमित्ताने ते 'झी मराठी' वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आले होते. यावेळी पूजाने चक्क मराठी भक्तीगीत गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.

(Pooja Hegde sing marathi bhajan ughad daar deva in chala hawa yeu dya zee marathi for circus promotion)

गेल्या काही वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम रसिक मनांचं मनोरंजन करत आहे,न थकता,न चुकता. यातील कुशल बद्रिके,भाऊ कदम(Bhau Kadam),श्रेया बुगडे(Shreya Bugde),गणेश भारतपुरे,सागर कारंडे,डॉ.निलेश साबळे(Dr.Nilesh Sable) या सहा जणांची टीम नुसती धमाल उडवत असते. त्यामुळे मराठीच नाही तर बॉलीवुडलाही या कार्यक्रमाची भुर पडली आहे. त्यामुळे अनेक बॉलीवुड कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात येत असतात. यंदा 'सर्कस' चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती.

यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, रणवीर सिंग, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री पूजा हेगडे, जॉनी लिव्हर, जॅकलिन फर्नांडिस आणि अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी पूजा हेगडेला मराठी गाणं गाण्याची विनंती करण्यात आली आणि तिने चक्क भक्तीगीत गायला सुरूवात केली.

यावेळी पूजाने 'देहाची तिजोरी.. भक्तीचाच ठेवा.. उघड दार देवा आता.. उघड दार देवा' हे मराठीतील लोकप्रिय भक्तीगीत गायलं. तिच्या तोंडून ही भजन आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. निलेश साबळे सह सर्वांनीच तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: गर्भपातासाठी पतीची परवानगी नको! उच्च न्यायालयाचे एकाच दिवशी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Nagpur News: नागपूरात बोगस बांधकाम कामगार नोंदणी; दलालांचे धाबे दणाणले, नागपूर, वर्धा जिल्ह्यात कारवाई!

Shoumika Mahadik : शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार की नाही, ४ शब्दात कंडका पाडला...

CM Devendra Fadnavis : मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना सवाल

Prakash Ambedkar : 'भाजप सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष, अजितदादा-एकनाथ शिंदे त्यांच्या तालावर नाचताहेत'; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT