pooja sawant and gashmir mahajani 
मनोरंजन

पूजा सावंत-गश्मीर महाजनीच्या 'त्या' चॅटचा अखेर उलगडा; म्हणाले, 'लव्ह यू..'

स्वाती वेमूल

अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांच्यामध्ये झालेल्या चॅट्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मी तुला खास सरप्राइज देतो, असं गश्मीर या चॅटमध्ये पूजाला म्हणताना दिसतोय. यावरून हे दोघं एकमेकांना डेट करतायत की काय अशीही चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या चॅटमागील खरं कारण समोर आलं आहे. गश्मीर आणि पूजा लवकरच एका नव्या चित्रपटात एकत्र काम करणार असून त्याचं नाव 'लव्ह यू मित्रा' असं आहे. गश्मीरने व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. 

'मित्र ही एक अशी व्यक्ती असते जी कायम आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते. मिनी फिल्म्स प्रस्तुत.. लव्ह यू मित्रा', असं कॅप्शन देत गश्मीरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मानसी बागला करत असून सिद्धार्थ साळवी यांनी पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

आजकाल चित्रपट प्रमोशनसाठी विविध फंडे वापरले जातात. त्यातच गश्मीर आणि पूजाने त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यासाठी चॅटचा अनोखा फंडा वापरला. त्यांच्या चॅटमुळे दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा झाली आणि या दोघांकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं. आता पूजा-गश्मीर ऑनस्क्रीन प्रेक्षकांची मनं जिंकू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पूजा सावंत सध्या 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तर गश्मीरची 'श्रीकांत बशीर' ही वेब सीरिज चांगली गाजली. स्टार प्लसवरील 'इमली' या मालिकेतही गश्मीर मुख्य भूमिका साकारतोय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT