Pooja Sawant Grand bachelor party held in Goa in the presence of actors video viral  Esakal
मनोरंजन

Pooja Sawant: पूजाच्या लग्नाची धामधूम! कलाकारांच्या उपस्थितीत गोव्यात पार पडली ग्रँड बॅचलर पार्टी, व्हिडिओ व्हायरल

Pooja Sawant: धमाल बॅचलर्स पार्टीचा व्हिडिओ पूजाने शेयर केला आहे.

Vaishali Patil

Pooja Sawant 's Bachelors Party in Goa: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत पूजा सावंतच्या नावाचा सामावेश आहे. पूजाने आजवर अनेक सिनेमांमध्ये याशिवाय वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

पूजाने काहीच दिवसांपुर्वी चाहत्यांना एक गोड बातमी देत तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला होता. पूजाने अचानक तिचं रिलेशनशीप उघड केल्याने सर्वांना सुखद धक्का बसला. पूजाने सोशल मीडियावर तिच्या भावी नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेयर केले. पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत साखरपूडा उरकला असून लवकरच ती त्याच्यासोबत लग्नबंधात अडकणार आहे.

आता पूजाच्या गँगने गोव्यामध्ये तिच्यासाठी बॅचलर्स पार्टी केली आहे. या धमाल बॅचलर्स पार्टीचा व्हिडिओ पूजाने शेयर केला आहे.

या व्हिडिओत मनोरंजन विश्वातील तिचे मित्र सहभागी झाले होते. या व्हिडिओत पूजासोबत अभिषेक जावकर, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, रुचिरा सावंत, श्रेयस सावंत मस्ती करताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहायला मिळतं हे सर्व कधी मज्जा मस्ती करताना दिसत आहेत तर कधी पोहण्याचा आनंद घेत आहेत. इतकंच नाही तर पूजाने तिच्या बॅचलर्स पार्टीत केक कापून भन्नाट सेलिब्रेशन केलं आहे.

यावेळी पूजाच्या आगामी सिनेमाचे मुसाफिरा चित्रपटाचे गाणे बॅकग्राउंडला वाजत आहे. सध्या पूजाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया देत आहेत.

पूजा लग्न कधी करणार?

पूजा लग्न कधी करणार असा प्रश्न तिला नुकताच मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, "सध्या तरी चव्हाण आणि सावंत कुटुंबात बोलणी सुरु आहेत. आम्ही दोघं जेव्हा comfortable असू तेव्हा आम्ही लग्नाचा निर्णय घेऊ."

पूजाचा बॉयफ्रेंड झगमगाटापासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या प्रायव्हसीचा आदर करणं, हे पूजाला तिचं कर्तव्य वाटतं.

पूजा आगामी 'मुसाफिरा' चित्रपटात झळकणार आहे. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळतेय. हा सिनेमा २ फेब्रुवारी २०२४ ला भेटीला येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT