Poonam Pandey Death News : पूनम पांडे प्रसिद्धीसाठी काय करेल याचा भरवसा नव्हता. तिनं सोशल मीडियावर जी काही वक्तव्य केली होती ती तिनं खरी करुन दाखवली. (Poonam pandey latest marathi news) बाकीच्या वक्तव्याबाबत ती तटस्थ राहिली. मात्र जे बोलली त्यामुळे तिला मिळालेली प्रसिद्धी लोकप्रियतेच्या दिशेनं घेऊन गेली असे म्हणता येईल.
कानपूर सारख्या शहरातून आलेल्या पूनमचा जीवनप्रवास नेमका कसा होता, मुंबईतल्या (Who is Poonam Pandey) झगमगत्या बॉलीवूडची तिला भुरळ कशी पडली, इतर सेलिब्रेटींपेक्षा ती कशी वेगळी होती. वर्ल्ड कपच्या वेळी तिनं केलेलं वक्तव्य, आयपीएल सामन्याच्या वेळी तिनं (Latest Marathi entertainment news) केलेलं फोटोशूट यामुळे पूनमवर जो शिक्का बसला तो तसाच राहिला असंही बोललं जातं.
२०११ च्या वर्ल्डकपच्या वेळी पूनम पांडेनं जे विधान केलं होतं त्यामुळे तिला खूपच प्रसिद्धी (Poonam Pandey World Cup Controversy) मिळाली. भारतानं जर फायनल जिंकली तर आपण बोल्ड फोटो शूट करणार अशा आशयाचे तिनं विधान केले होते. मात्र तिनं तसे काही केले नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या पूनमला बॉलीवूडमधील (Poonam pandey latest news) अनेक कार्यक्रमांचे निमंत्रण मिळत असे. कित्येक सेलिब्रेटी पार्ट्यांना ती हजर राहायची.
वेगवेगळ्या प्रकारच्या वादातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर पूनमनं त्याचा उपयोग तिच्या करिअरसाठी केल्याचे दिसुन येते. तिनं काही रियॅलिटी शओ मध्ये जाऊन पब्लिक सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिनं सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटोशूट करुन प्रसिद्धी आणि चाहते मिळवण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जाते.
आयपीएलच्या पाचव्या सीझनमधून पुन्हा एकदा पूनम पांडे ही चर्चेत आली होती. जेव्हा (Poonam Pandey IPL Controversy) कोलकाता नाईट रायडर्स आणि चैन्नई सुपरकिंग्सची फायनल सुरु होती तेव्हा तिनं वानखेडे स्टेडियम मध्ये न्यूड फोटोशूट केले होते. त्यावरुन तिच्यावर खूप टीकाही झाली होती. ते फोटो तिनं सोशल मीडियावर शेयर देखील केले होते. ते फोटो पोस्ट केल्यानंतर तिनं म्हटलं होतं की, मी जसं लिहिलं होतं त्याप्रमाणे ते शब्द खरे करुन दाखवले आहेत.
पूनमविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास तिचा उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ११ मार्च १९९१ मध्ये पूनमचा जन्म झाला. पूनमला महाविद्यालयात असल्यापासून अभिनेत्री होण्याची इच्छा होती. तिनं एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यात तिला बऱ्यापैकी यश मिळाले. काही जाहिरांतीमध्ये देखील ती चमकली होती. ग्लॅडरॅग्स मॅनहंट अँड मेगामॉडेल कॉन्टेस्टमधील सर्वोत्तम ९ स्पर्धकांमध्ये पूनमच्या नावाचा समावेश होता.
पूनम Gladrags Manhunt and Megamodel Contest मध्ये चमकली होती. त्यांच्या मॅगझीनच्या कव्हरपेजवर तिचा फोटोही होता. त्या फोटोचे खूप कौतुकही झाले होते. त्यानंतर पूनम वेगवेगळ्या प्रकारे बॉलीवूड आणि टीव्ही मनोरंजन विश्वात सक्रिय असल्याचे दिसून आले. तिनं वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये देखील आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले.
कंगनाच्या लॉक अप नावाच्या रियॅलिटी शो ने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यापूर्वीनं तिनं फियर फॅक्टमध्ये देखील सहभाग घेतला होता. पूनमच्या अशा अचानक एक्झिटनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तीन दिवसांपूर्वी पूनमचा गोव्यातील व्हिडिओ इंस्टावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्या आजच्या निधनाच्या बातमीनं वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.