Poonam Pandey FIR Fake Death News esakal
मनोरंजन

Poonam Pandey FIR : कॅन्सरविषयी जनजागृती करण्याच्या नावाखाली केलंय स्वत:चे प्रमोशन AICWA च्या तक्रारीत काय आहेत आरोप?

पूनम पांडेच्या विरोधात (Poonam Pandey FIR) आता मनोरंजन विश्वातील काही संघटना एकटवल्या आहेत. त्यांनी तिच्या विरोधात आक्रमक पाऊल उचललं आहे.

युगंधर ताजणे

Poonam Pandey FIR Fake Death News : अभिनेत्री पूनम पांडेनं सर्व्हिकल कॅन्सरच्या नावाखाली तिच्या निधनाचे वृत्त व्हायरल केले. (Poonam Pandey Alive) तिच्या पीआर टीमनं इंस्टावरुन पोस्ट व्हायरल करत तिच्या निधनाविषयी माहिती दिली होती. यानंतर मनोरंजन विश्वात (Poonam Pandey FIR News) मोठी खळबळ उडाली होती. सगळीकडे पूनमचे निधन झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

या सगळ्यात पूनमनं काल एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात तिनं (Poonam Pandey Latest News) मी कुठेही गेलेली नाही.मी जिवंत आहे. असे सांगून पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का दिला. त्यानंतर मात्र तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. सोशल मीडियावर तिच्या निधनावरुन मीम्सही व्हायरल झाले होते. पूनमला प्रचंड प्रमाणात ट्रोल (Poonam Pandey Viral Video) करण्यात आले होते. यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशनच्या वतीनं पूनमवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

२ फेब्रुवारी रोजी पूनमच्या निधनाची बातमी समोर आली होती. मात्र त्यावेळी देखील तिच्या काही चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या सगळ्यात (AICWA) पूनमचे काहीतरी सरप्राईज असणार, ती खोटं बोलत आहे असे सांगण्यात आले. पूनमनं जे काही केले ते चूकीचे असून त्यातून चूकीचा संदेश जात असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटींचाही समावेश आहे.

मनोरंजन विश्वातील अनेकांनी आता पूनमच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. (Poonam Pandey Latest Marathi News) त्यात AICWA ने पुढाकार घेत मुंबई पोलिसांनी तिच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे हे जाणून घेऊयात.

अॅडव्होकेट काशिफ यांनी अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीचे मॅनेजर निकीता शर्मा आणि एजन्सीच्या विरोधात देखील आयपीसी सेक्शन ४१७, ४२०, १२० बी, ३४ च्या न्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लोकांची फसवणूक करणे, त्यांच्या भावना दुखावणे, तसेच सर्व्हिकल कॅन्सरच्या नावाखाली स्वताच्या नावाचे प्रमोशन करणे, पब्लिसिटी स्टंट करणे असे आरोप पूनमवर करण्यात आले आहे.

AICWA ने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी तसे लेखी निवेदन देखील केले आहे. पूनमनं जे काही केले ते चूकीचे आहे. त्याबद्दल तिला शिक्षा व्हायला हवी. असे त्यांनी त्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT