poonam sam 
मनोरंजन

पूनम पांडे लग्नाच्या १३ दिवसांतच घेणार पती सॅम बॉम्बेसोबत घटस्फोट, म्हणाली 'सॅमने माझा गळा दाबला आणि..'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेने लग्नाच्या १३ दिवसांतंच पती सॅम बॉम्बेसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबर रोजी पूनमने पती सॅम विरोधात एफआयआर दाखल केली होती. दोघेही हनीमूनसाठी गोव्याला गेले होते तिथेच त्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. पूनमने पोलिसांत तक्रार केल्याने पती सॅमला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आता जामीन देखील मिळाला आहे. 

पूनम पांडे काही दिवसांपूर्वीच सॅम बॉम्बेसोबत एअरपोर्टवर डोक्यात सिंदूर, हातात लाल चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये दिसून आली होती. दोघांनी सोशल मिडियावर त्यांचे लग्नाचे, मेहेंदीचे फोटो शेअर केले होते. १० सप्टेंबरला दोघांनी त्यांच्या लग्नाची घोषणा सोशल मिडियाच्या माध्यमातून केली होती. इतकंच नाही तर पूनमने त्यांच्या या फोटोसोबत सात जन्म तुझीच साथ पाहिजे असं देखील सॅमला टॅग करत म्हटलं होतं. मात्र सात जन्मांचं काय घेऊन बसलात इथे तर दोन आठवड्यातंच पूनमने त्यांचं वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय. पूनम आणि सॅम दोन वर्षांपासून लीव्ह इनमध्ये होते. पूनमने या सगळ्या प्रकरणावर आता मौन सोडलंय. पूनमचं म्हणणं आहे की ती सुरुवातीपासूनंच अपमानकारक रिलेशनशिपमध्ये होती.

ETimes सोबत बोलताना पूनमने सांगितलं की ती सॅमसोबतचं तिचं लग्न तोडणार आहे. ती म्हणाली, 'सॅम आणि माझ्यात मोठं भांडण झालं जे टोकापर्यंत गेलं आणि सॅमने मला मारायला सुरुवात केली. त्याने माझा गळा दाबला आणि मला वाटलं की मी आता मरेन. त्याने माझ्या चेह-यावर मारलं. माझे केस खेचले, माझं डोकं पकडून बेडच्या टोकावर आपटलं. त्याने मला गुडघ्याच्याो जोराने बसवलं आणि माझा छळ केला.'

पूनमने सांगितलं की कशाप्रकारे ती स्वतःला त्यातून सोडवून खोलीतून पळून गेली. 'हॉटेलच्या लोकांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याला घेऊन गेले. मी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीपासूनंच मी त्याच्यासोबत अब्युझिव रिलेशनशिपमध्ये आहे. आणि आता मी निर्णय घेतला आहे की मी हे लग्न तोडून घटस्फोट घेणार आहे.'      

poonam pandey open up about fight with husband sam bombay tell she will end her marriage  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

NASA Scientist Salary: NASA मध्ये संशोधन शास्त्रज्ञाला किती पगार मिळतो; जाणून घ्या सुविधा काय आहेत?

SCROLL FOR NEXT