Pop singer Jubin Nautiyal esakal
मनोरंजन

'तुझे कितना चाहने लगे हम..'; 'जुबीन'च्या गाण्यांवर थिरकली सावंतवाडी, 'लाईव्ह शो'ला चाहत्यांची मोठी गर्दी

गायक जुबीन नौटीयाल याला स्टेजवरील एन्ट्रीनेच युवाईने एकच जल्लोष केला.

सकाळ डिजिटल टीम

90 च्या दशकात प्रसिद्ध असलेली गाणी गायक जुबीन याने आपल्या आवाजात म्हटली.

सावंतवाडी : ‘बहोत आयी गयी यादे, मगर इस बार तू ही आना’ अशा तरुणाईच्या हृदयावर छाप टाकणाऱ्या एकापेक्षा एक गाण्याने इंटरनॅशनल प्रसिद्ध प्ले बॅक व पॉप सिंगर जुबीन नौटीयाल (Jubin Nautiyal) यांच्या गाण्यावर सावंतवाडी जिमखाना मैदानावर तरुणाई बेभान होऊन थिरकली.

त्याने आपल्या आवाजात सादर केलेल्या ‘बजरंगी भाईजान''मधील ''कुछ तो बता जिंदगी'' तसेच ''कबीर सिंग''मधील ''तुझे कितना चाहने लगे हम'' या गाण्यांनी तर तरुणाई मैदान डोक्यावर घेतले. एकूणच हा लाईव्ह शो हजारो चाहत्यांच्या गर्दीने हाऊसफुल्ल ठरला.

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १५) प्रसिद्ध प्ले बॅक व पॉप सिंगर जुबीन नौटीयाल यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचा प्रोग्रॅम झाला. यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक जुबीन नौटीयाल याला स्टेजवरील एन्ट्रीनेच युवाईने एकच जल्लोष केला. सावंतवाडीकरांना हात उंचावून ''तेरी मेहेरबानी अंधेरो से हम गुजर गये'' या गाण्याने त्याने सुरुवात केली.

त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर न थांबता जुबीन याने मिले है नसिब से, गजब का है दिन सोचो जरा, त्यानंतर पेहला नशा अशी लागोपाठ गाणी गायीली. त्यानंतर तारो के शहर में हे गाणे सादर केले. आपल्या उत्कृष्ट गायिकीच्या अंदाजात त्याने युवा रसिक प्रक्षकांना एका जाग्यावर खिळवून ठेवत मनोरंजन केले. या गाण्यांवर तरुणाईने बेभान होऊन जुबीन याला साथ दिली.

शेरशाह चित्रपटातील राता लंबीया लंबीया रे हे गाणे रसिकांना अधिकच भावले. 90 च्या दशकात प्रसिद्ध असलेली गाणी गायक जुबीन याने आपल्या आवाजात म्हटली. यानंतर बजरंगी भाईजान मधील कुछ तो बता जिंदगी या गाण्यावर युवाई थिरकली. यावेळी स्टेजवर गायक जुबीन नौटीयाल याच्या उपस्थितीत विशाल परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी कबीर सिंग चित्रपटातील तुझे कितना चाहने लगे हम या गाण्याने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT