popular assamese musician and flute player prabhat sarma dies at 85 in Guwahati 
मनोरंजन

प्रसिध्द संगीतकार, बासरीवादक प्रभात शर्मा यांचे निधन 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आसामचे प्रख्यात संगीतकार आणि बासरीवादक प्रभात शर्मा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी गुवाहाटीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 85 वर्षांच्या शर्मा यांनी आपल्या संगीतानं मोठा चाहतावर्ग तयार केला होता. केवळ एका राज्यापुरती त्याचे सांगितिक कार्य मर्यादित नव्हते. तर देशभरात त्यांचे चाहते होते. त्यांच्या जाण्यानं आसाममधील संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शर्मा यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

प्रभात शर्मा यांच्या निधनाविषयी अधिक माहिती देताना त्यांची मुलगी ताराली शर्मा यांनी सांगितले की, ते पहाटे साडेचार वाजता उठले होते. त्यानंतर त्यांनी आईशी काही वेळ संवादही साधला होता. त्यानंतर ते पुन्हा झोपले. जेव्हा सकाळी सहा वाजता त्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो असताना ते हे जग सोडून गेल्याचे कळले.

गुवाहाटीतील अंबिकानगरीत त्यांनी प्राण सोडला. त्यांची मुलगी ताराली या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका आहेत. प्रभात शर्मा य़ांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, नातु असा मोठा परिवार आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, प्रभातजी यांचे जाणे हे आपल्या राज्याच्या सांस्कृतिकतेच्या दृष्टीनं क्लेशकारक आहे.

काही राजकीय पक्ष, संघटना यांनीही शर्मा यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानीत असणा-या शर्मा यांचे आसामच्या पारंपारिक संगीतासाठी असणारे योगदान मोठे आहे. त्यांना त्यासाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्याकडे अनेक वाद्यांचा संग्रह होता. ज्यातील वाद्ये ही आता सहजासहजी मिळत नाहीत. त्यांनी एक छोटसे संग्रहालय तयार केले असून त्यात ती वाद्ये ठेवण्यात आली आहेत. शर्मा यांनी वेगवेगळ्या हिंदी मालिकांनाही संगीत दिले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT