Suchandra Dasgupta, Suchandra Dasgupta news, Suchandra Dasgupta passed away, Suchandra Dasgupta accident
Suchandra Dasgupta, Suchandra Dasgupta news, Suchandra Dasgupta passed away, Suchandra Dasgupta accident SAKAL
मनोरंजन

Suchandra Dasgupta: रस्ते अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू.. चाहत्यांना जबर धक्का

Devendra Jadhav

Suchandra Dasgupta Accident News: बंगाली प्रादेशिक टीव्ही मनोरंजन क्षेत्राकडून एक दुःखद आणि हृदयद्रावक माहिती समोर आलीये.

यावेळीही, एका प्रतिभावान बंगाली अभिनेत्रीचं दुःखद निधन झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीये. ही अभिनेत्री म्हणजे सुचंद्रा दासगुप्ता. सुचंद्राचा असते अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय.

एबीपी बांग्ला मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगाली टीव्ही अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ताचा रस्ते अपघातात दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील बारानगर भागात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, तिने शूटिंगनंतर घरी जाण्यासाठी अॅप-बाईक राइड बुक केली होती. रिपोर्ट्सनुसार घरी परतत असताना तिची अॅप-बाईक एका ट्रकला धडकली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ती सोदेपूर परिसरात राहते असे अहवालात म्हटले आहे. बारानगर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, अपघातानंतर बीटी रोडजवळ वाहतूक कोंडी झाली आणि स्थानिक पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

सुचंद्रा दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका 'गौरी'मध्ये झळकली. या मालिकेतून सुचंद्रा दासगुप्ताला खूप प्रसिद्धी मिळाली. तिच्या फॅन्समध्ये सुद्धा प्रचंड वाढ झाली.

बंगाली मनोरंजन विश्वातील टेली अभिनेते आणि अभिनेत्रींनी सुचंद्राला श्रद्धांजली वाहिली आहे. सुचंद्र दास यांनी अलीकडच्या काळात टेलिव्हिजन विश्वात खूप नाव कमावले आहे. त्यांच्या निधनामुळे बंगालच्या टीव्ही उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM: "मतमोजणी वेळी RO अधिकारी वॉशरूममध्ये जाऊन..." अनिल परब यांचे मोबाईल बदल प्रकरणी मोठे आरोप

Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

Snake In Car : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'

Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

Jayant Patil: या 8 गावांवर विशाल-विश्वजित यांचे विशेष लक्ष, जयंत पाटलांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे नियोजन?

SCROLL FOR NEXT