Kashiram Chinchay  
मनोरंजन

पारंपरिक कोळी गाण्यांचा बादशाह काशीराम चिंचय काळाच्या पडद्याआड

पारू गो पारू, डोल डोलतंय वाऱ्यावर, मी हाय कोळी, सन आयलाय गो यांसारखी कोळीगीतं सातासमुद्रापार लोकप्रिय झाली.

स्वाती वेमूल

पारंपरिक कोळी गाण्यांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे काशीराम चिंचय (Kashiram Chinchay) यांचं निधन जालं. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. कोळी गीतं सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे लोकशाहीर म्हणून त्यांची ओळख आहे.

काशीराम चिंचय यांच्यावर सुरुवातीला अंधेरीतील ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं. केईएम रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. डोल डोलतंय वाऱ्यावर, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी, मी हाय कोळी, सन आयलाय गो यांसारख्या अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते.

काशीराम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित अनेकांनी शोक व्यक्त केला. 'असे कलाकार पुन्हा होणे नाही, कोळी संस्कृतीचा एक बहुमोल मणी आज हरपला,' अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT