sherlyn and raj kundra  Team esakal
मनोरंजन

शर्लिन चोप्राला क्राईम ब्रँचकडून समन्स, चौकशीसाठी बोलवणार

पॉर्नोग्राफी (pornography) प्रकरणात गेल्या आठवड्यापासून कमालीच्या वादात आणि चर्चेत आलेला राज कुंद्रा (raj kundra) आता आणखी गोत्यात येणार असल्याचे दिसते आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - पॉर्नोग्राफी (pornography) प्रकरणात गेल्या आठवड्यापासून कमालीच्या वादात आणि चर्चेत आलेला राज कुंद्रा (raj kundra) आता आणखी गोत्यात येणार असल्याचे दिसते आहे. त्याला कारणही तसेच आहे. ज्या अभिनेत्रीनं राजवर आरोप केले होते, त्याच अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे तिच्याकडून आणखी कुठल्या गोष्टी समोर येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी शर्लिननं (sherlin chopra) आपल्याला राजनं त्याच्या व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी विचारणा केल्याचे म्हटले होते. (pornography case crime branch property sherlyn chopra asking her to appear yst88)

राजला नकार कळवला असता त्यानं आपले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही शर्लिननं यापूर्वी सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्री पुनम पांडेनं देखील राजच्या विरोधात एक पोस्ट शेयर केली होती. त्यात राजनं आपल्याला त्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. ते कॉन्ट्रक्ट साईन न केल्यास नावाबरोबर मेसेज व्हायरल करण्यात येईल. अशी धमकीही राजनं दिली होती. याप्रकरणामुळे राज वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे.

सध्या राज पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रकरणात चौकशीसाठी शर्लिनला बोलविण्यात आले आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार पोलीस आता पॉर्नोग्राफी प्रकरणात शर्लिन चोप्राशी चर्चा करणार आहे. त्यासाठी अभिनेत्रीला समन्स पाठविण्यात आले आहेत. शर्लिननं राजच्या विरोधात काही व्हिडिओ व्टिटरवर शेयर केले होते. त्यात तिनं याविषयावर सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र सायबरला आपली प्रतिक्रिया दिली होती.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक मोठं व्टिट केलं होत. तिनं म्हटलं होतं की, काही दिवसांपासून पत्रकार मला फोन करत आहेत. व्हाट्स अपवर मेसेज करत आहे. काहींनी मेलही केले आहेत. माझ्याकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती हवी आहे. ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा महाराष्ट्र सायबर पोलिसांना माहिती दिली होती, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मीच आहे. असे शर्लिननं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT