Prabhas fan slaps actor after he poses for selfie with him in video viral  SAKAL
मनोरंजन

Prabhas Video: आधी सेल्फी काढला नंतर चापट मारली, प्रभासच्या फॅन्सचा गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल

प्रभासच्या फॅनचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Prabhas fans Video Viral: प्रभासचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. आदिपुरुष फ्लॉप झाला तरीही प्रभासचं फॅन फॉलोईंग कमी झालं नाहीय. प्रभासच्या फॅनचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.

या व्हिडीओत प्रभास एअरपोर्टवर येताच फॅनने असं काही केलं की, प्रभासला हसावं की रडावं की कळत नाहीय. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. बघूया काय आहे या व्हिडीओत.

(Prabhas fan slaps actor after he poses for selfie with him in video viral)

आधी सेल्फी काढला मग चापट मारली

या व्हिडीओत पाहायला मिळतं की प्रभास एअरपोर्टवर चालत येतो. इतक्यात एक एक्साईटेड मुलगी प्रभासला अडवून त्याच्यासोबत सेल्फी काढते.

सेल्फी काढल्यावर त्या मुलीला इतका आनंद होतो की, लाडात प्रभासच्या गालावर चापट मारते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

प्रभासचा जुना व्हिडीओ व्हायरल

प्रभासचा हा व्हिडीओ 2019 मधला आहे. तिच्या आवडत्या स्टारला भेटून रोमांचित झालेली मुलगी प्रभासला पाहताच उत्साहाने उडी मारताना दिसते. दोघांनी फोटोसाठी पोज दिली. फोटो पूर्ण होताच, उत्साही मुलीने प्रभासला थप्पड मारली. तिच्या या कृतीने प्रभाससह सर्वांनाच धक्का बसला. प्रभास सुद्धा गालावर हात लावत हसताना दिसतोय.

सालार चाहत्यांची वाट पाहत आहेत

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या प्रभास त्याच्या बहुप्रतिक्षित 'सालार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला आहे, ज्यामध्ये चाहत्यांना प्रभासचा खतरनाक लुक खूप आवडला आहे.

याशिवाय प्रभास आगामी कल्की सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत दीपीका पादुकोण आणि अमिताभ बच्चन झळकणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT