Adipurush Esakal
मनोरंजन

Adipurush: प्रभासच्या फॅन्सचा राडा! हैदराबादमध्ये थिएटरची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Prabhas Fans Vandalize Hyderabad Theater: मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुषची चर्चा होती. अनेक महिन्यापासून चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. अखेर काल म्हणजेच 16 जूनला आदिपुरुष सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

कालच नव्हे तर आजही सोशल मिडियावर फक्त आदिपुरुष आणि त्यातल्या कलाकारांची चर्चा रंगली होती. प्रभासच्या चाहत्यांनी तर या सिनेमाला डोक्यावर घेतल. कुठे मोठं मोठे बॅनर लावण्यात आले तर कूठे प्रभासच्या फोटोची पुजा करण्यात आली.

त्याच्या चाहत्यांनी चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याची संधी सोडली नाही. साऊथमध्ये सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळाली. एकी कडे प्रभासच्या चाहत्यांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिले तर काहींनी कहरच केला.

एकीकडे चित्रपटाला खराब म्हणाऱ्या एका प्रेक्षकाला प्रभासच्या चाहत्यांनी मारलं तर दुसरीकडे एका चाहत्याने बियरची बॉटलने हात कापुन प्रभासच्या फोटोला टिळा लावला. आता तर आणखी वेगळी बातमी समोर आली आहे. काही चाहत्यांवर प्रभासच्या क्रेझ इतकी वरचढ झाली की त्यांनी थिएटरची तोडफोड केली.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हैदराबादजवळील रामचंद्रपुरम येथील थिएटरमध्ये आदिपुरुषचे स्क्रिनिंग 40 मिनिटे उशीराने झाले यानंतर चाहते इतके संतप्त झाले की त्यांनी रागाच्या भरात थिएटरच्या काचा फोडल्या. यानंतर पोलिसांनी कारवाई करत चित्रपटगृहातील गुंडांना ताब्यात घेतले.

याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते खिडक्या तोडताना आणि काचा फोडताना दिसत आहेत. काही कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाला 40 मिनिटे उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.

सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट अखेर रिलीज झाला. यामध्ये दिग्दर्शक ओम राऊतने मराठी कलाकारांना देखील संधी दिली आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

एकाच दिवशी तब्बल ६२०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT