prabhas play lord shiva in upcoming movie Kannappa after adipurush flop  SAKAL
मनोरंजन

Prabhas: आदिपुरुषच्या अपयशानंतर प्रभासला भगवान शंकर तारणार? आगामी सिनेमात महादेव साकारणार

आदिपुरुष नंतर प्रभास पुन्हा एकदा पौराणिक भुमिका साकारणार आहे

Devendra Jadhav

Prabhas as Lord Shiva: भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभास. प्रभासचा आदिपुरुष सिनेमा सपशेल अपयशी ठरला. आदिपुरुष सुपरहिट होईल अशी प्रभासला आणि त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण प्रभासचा आदिपुरुष बॉक्स ऑफीसवर आपटला.

आदिपुरुष सिनेमात प्रभासने श्रीरामांची भुमिका साकारली होती. पण प्रभासने साकारलेले प्रभु श्रीराम चाहत्यांना इतके आवडले नाहीत. आता आदिपुरुष नंतर प्रभास आणखी एक पौराणिक भुमिका साकारणार आहे. ती म्हणजे भगवान शंकर. जाणुन घ्या सविस्तर.

(prabhas play lord shiva in upcoming movie Kannappa after adipurush flop)

प्रभास साकारणार महादेवाची भुमिका

रिपोर्ट्सनुसार, प्रभास आगामी सिनेमात भगवान शिवाची भूमिका साकारणार आहे. प्रभासचे वडील सूर्यनारायण राजू यांनी "भक्त कन्नप्पा" ची निर्मिती केली आहे. “कनप्पा” या भक्तिमय सिनेमाची निर्मिती करणाऱ्या मंचू विष्णूने सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेसाठी प्रभासशी संपर्क साधला.

आणि विशेष गोष्ट म्हणजे प्रभासने भगवान शिवाची भूमिका करण्यास होकार दिल्याची माहिती आहे. नुकताच या चित्रपटाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. प्रभासने अधिकृत जाहीर केलं नसलं तरीही त्याचे चाहते त्याला महादेवाच्या भुमिकेत पाहायला उत्सुक आहेत.

प्रभासचा कन्नपा देणार अद्वितीय अनुभव

कन्नप्पा सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग यांनी केले आहे. मुकेश त्याच्या भव्यदिव्य अशा महाभारतम मालिकेसाठी ओळखला जातो. कन्नप्पा सिनेमागृहात एक 'अद्वितीय'अनुभव देईल यात शंका नाही. या चित्रपटाचे लेखन परचुरी गोपालकृष्ण, बुर्रा साई माधव आणि थोटा प्रसाद यांनी केले आहे आणि मणि शर्मा आणि स्टीफन देवासी यांना संगीत दिले आहे. Ava Entertainment आणि 24 Frames Factory यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

प्रभासचे आगामी सिनेमे

दरम्यान, प्रभासचे आणखी काही प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. केजीएफचे प्रशांत नील दिग्दर्शित 'सलार'मध्ये अभिनेता दिसणार आहे. हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार होता पण टीमने तो लांबवण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याकडे कल्की 2829 ई. प्रभास दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि राणा दग्गुबती यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT