Prabhas Upcoming Films Esakal
मनोरंजन

Prabhas: महाशिवरात्रीनिमीत्त प्रभासनं चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज, 'येत्या सात महिन्यात..'

सकाळ डिजिटल टीम

साउथचा बाहुबली जो बॉलिवूडसह सर्वांनाच जड पडला असा प्रभास आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचे चाहते प्रभासच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. बाहुबली 2 नंतर प्रभासचे दोन चित्रपट फ्लॉप गेल असल तरी त्याचा काडीमात्र परिनाम त्याच्या स्टारडम झालेला नाही. प्रभासने आता महाशिवरात्रीनिमीत्त त्याच्या चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली आहे.

प्रभासचे एक दोन नव्हे तर 3 बिग बजेट चित्रपट लवकरच येणार आहेत. आता प्रभासने त्याच्या आगामी आदिपुरुष, सालार, प्रोजेक्ट के या चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. प्रभासने ट्विट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

प्रभासने ट्विटमध्ये लिहिले- 'रिबेलस्टार या ट्विटमध्ये प्रभासने त्याच्या आगामी चित्रपटांच्या रिलीज डेटबद्दल लिहिले आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' 16 जून 2023 रोजी , 28 सप्टेंबर 2023 रोजी 'सालार' प्रदर्शित होणार आहे. तर 12 जानेवारी 2024 रोजी 'प्रोजेक्ट के' रिलीज होणार आहे. प्रभासने पुढे लिहिले- 'सगळं सुरळीत झालं तर सात महिन्यांत 3 चित्रपट'

प्रभास दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'प्रोजेक्ट के' ची रिलीज डेट शेअर करतांना चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये, धुळीच्या पार्श्वभूमीमध्ये बंदुकांसह तीन पुरुष एका हातावर निशाणा साधताना दिसत आहेत. यासोबतच पोस्टरवर 'द वर्ल्ड इज वेटिंग' असे लिहिले आहे आणि चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे.

हे पोस्टर शेअर करत प्रभासने चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. अगदी वैजयंती मुव्हीजनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि सर्व चाहत्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT