मनोरंजन

Salaar Postponed: शाहरुखच्या 'जवान'पुढे बाहुबली प्रभासची माघार, 'सालार'ची रिलीज डेट पुढे ढकलली!

Vaishali Patil

Prabhas Upcoming Movie Salaar : साउथ सुपरस्टार प्रभास हा सध्या त्याच्या आगामी सिनेमा 'सालार पार्ट 1: सीझफायर' मुळे चर्चेत आहे. प्रभासचा यापुर्वी आदिपुरुष हा सिनेमा रिलिज झाला. या चित्रपटापासून त्याच्या चाहत्यांना खुप अपेक्षा होत्या मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

त्याचे यापुर्वीचेही सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नसले तरी त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. प्रभासचे चाहते त्याच्या आगामी सालार सिनेमाची वाट पाहत आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार आता प्रभासच्या सालारची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये रिलिज होणारा हा सिनेमा आता डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सालारची डेट पुढे ढकल्यामागे शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा कारणीभुत असल्याच्या चर्चा आहेत. जवान चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगच्या पार्श्वभूमीवर सालारच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याच बोललं जात आहे.

प्रभास पुन्हा एकदा प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' चित्रपटात फुल अॅक्शन करताना दिसणार आहे. प्रभास आणि श्रुती हासन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाले आहे.

हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता मात्र आता सालार डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024 मध्ये रिलिज होईल. तर सालारचा ट्रेलर ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा होती मात्र तेही झालं नाही.

चित्रपट समीक्षक मनोबाला विजय यांनी पॅन इंडिया स्टार प्रभासच्या 'सालार'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे ,अशी माहिती दिली. सालारचे रिलीज पुढे ढकलल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांनी यावर मिम्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.


(Latest Marathi News)

डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024 रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' विकी कौशलचा 'सॅम बहादूर' आणि शाहरुख खानचा 'डिंकी' या चित्रपटांसोबत 'सालार'ची टक्कर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT