Kalki Koechlin : 'अनुराग दिसतो तसा नाही, त्याला सोडल्यानंतर मला चक्क...!' दुसरी पत्नी कल्कीनं स्पष्टच सांगितलं

देव डी सारख्या चित्रपटांतून कल्कीनं तिच्या अभिनयानं समीक्षक, जाणकारांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
Kalki Koechlin Comment On Director Anurag Kashyap Divorce
Kalki Koechlin Comment On Director Anurag Kashyap Divorceesakal

Kalki Koechlin Comment On Director Anurag Kashyap Divorce : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. त्यानं आजवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या अनुरागच्या बाबत त्याची एक्स वाईफ कल्की कोचलीनं त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

देव डी सारख्या चित्रपटांतून कल्कीनं तिच्या अभिनयानं समीक्षक, जाणकारांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अनुरागच्या करिअऱमधील देव डी हा चित्रपट महत्वाचा मानला जातो. त्या चित्रपटानं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. त्या चित्रपटापासून कल्की आणि अनुराग यांच्यातील लवस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यांनी २०११ मध्ये लग्न केले.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

अनुराग आणि कल्कीचा संसार हा काही फार काळ टिकला नाही. २०१५ ते वेगळे झाले. अनुरागसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कल्कीला मानसिक त्रासाचा सामना करावा लागला होता. तिला वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

यासगळ्या विषयी तिनं एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. त्यात तिनं अनेकांना अनुराग काय आहे हे माहिती नाही. पण मी जेव्हा त्याच्यासोबत घटस्फोट घेतला तेव्हा मात्र खूपच मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागल होतं.

सध्या कल्की ही तिच्या गोल्डफिश नावाच्या चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. त्याच्या मुलाखतीच्या निमित्तानं तिनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अनुरागसोबत घटस्फोट झाल्यानंतर बराचकाळ माझे कुणीही मित्र नव्हते. कुणीही फारसे बोलतही नव्हते. माझी परिस्थिती अशी होती की, मला काही काळ थेरपीही घेतली होती. आमच्या घटस्फोटाला सात-आठ वर्षे होऊन गेली आहेत.

Kalki Koechlin Comment On Director Anurag Kashyap Divorce
Jawan Shah Rukh Khan : 'हे माझं शेवटचं टक्कल, यानंतर मी पुन्हा कधीही....!' किंग खाननं सांगून टाकलं

कल्कीच्या त्या मुलाखतीनं तिच्या आणि अनुरागच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कल्कीन सगळ्यात पहिल्यांदा अनुरागच्या २००९ मध्ये आलेल्या देव डी नावाच्या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती २०१० मध्ये पुन्हा अनुरागच्या दॅट गर्ल्स इन यलो बुट्स नावाच्या चित्रपटात आणि सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.

Kalki Koechlin Comment On Director Anurag Kashyap Divorce
Jawan Trailer: बादशाहचा दुबईत जलवा! जवानचा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर; हजारो चाहत्यांची उपस्थिती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com