prabhudeva 
मनोरंजन

प्रभुदेवा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत? जाणून घ्या कोणाला करतायेत डेट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- दिग्दर्शक, अभिनेता आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या रिलेशनशिपमुळे. प्रभुदेवा पुन्हा एकदा प्रेमात पडले असल्याची चर्चा आहे. ते लवकरच दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहेत. एक ग्रुप डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणारे प्रभुदेवा आजच्या घडीला केवळ साऊथ सिनेमांमधीलच नाही तर बॉलीवूडमधील देखील टॉपचे कोरिओग्राफर आणि दिग्दर्शकांपैकी एक आहेत. प्रभुदेवा यांनी २०११ मध्ये अधिकृतरित्या पत्नी रामलता पासून घटस्फोट घेऊन वेगळे झाले होते.  

प्रभुदेवा यांच्याविषयी आता अशी चर्चा आहे की ते पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आहेत. ई-टाईम्सने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय, प्रभुदेवा आत्ता त्यांच्या भाचीला डेट करत आहेत आणि लवकरंच ते तिच्यासोबत लग्न करण्याच्या तयारीत आहेत. या बातम्यांवर अजुनतरी प्रभुदेवा यांच्याकडून अधिकृतरित्या कोणतीही अनाऊंसमेंट आलेली नाही.तसंच त्यांच्या टीमकडूनही या माहितीबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

प्रभुदेवा आणि त्यांची पत्नी रामलता यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाल्यानंतर ते दोघेही वेगळे झाले होते. त्यांचं नाव साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिच्याशी देखील जोडलं गेलं होतं. ज्यावेळी प्रभुदेवा यांचं नयनताराशी नाव जोडलं जात होतंं तेव्हा ते रामलतासोबत विवाहबंधनात होते आणि त्यांना तीन मुलं देखील होती. असं असूनदेखील ते नयनतारावर प्रेम करत होते. मात्र दोघांची रिलेशनशिप फार काळ टिकू शकली नाही आणि ते वेगळे झाले.   

prabhu deva to tie the knot again all set to marry for the second time  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुला बॅट फेकायला मजा येते...! दिनेश कार्तिकच्या गुगलीवर रिषभ पंतची 'फेका फेकी', पाहा मजेशीर Video

Weight Loss Injection: खरंच वजन कमी करणं एवढं सोपं आहे? भारतात वेट लॉस इंजेक्शनची 3 महिन्यांत 50 कोटींची विक्री! तज्ज्ञांचं मत काय?

Ambad News : एस.बी.आय. बँकेच्या शाखेतून अज्ञात चोरट्याने मारला दोन लाख तीस हजार रुपयांवर डल्ला: बँक शाखेतून केले चोरट्याने पलायन

Pune News: शासनाच्या निर्णयाला डॉक्टरांचा विरोध, २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद; कधी अन् केव्हा?

Stock Market Closing: सेन्सेक्स 381 अंकांच्या घसरणीसह बंद; आज शेअर बाजारात विक्री का झाली?

SCROLL FOR NEXT