prajakta gaikwad
prajakta gaikwad 
मनोरंजन

अफलातून! प्राजक्ता गायकवाडचा लाठीकाठी करतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच

स्वाती वेमूल

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ. या व्हिडीओत प्राजक्ता साडी नेसून अत्यंत सहजपणे लाठीकाठी फिरवताना पाहायला मिळतेय. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

'कौतुक याचे नाही की सहावारी साडीत लाठीकाठी करणं, तर अभिमान या गोष्टीचा आहे.. वाजवतो नि गाजवतो तलवार मनगटी फिरवतो, झोपलेले ही होतात जागे जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. प्राजक्ताने याआधी घोडेस्वारीचाही व्हिडीओ पोस्ट केला होता. तर काही महिन्यांपूर्वी तिने जेजुरीला ४२ किलो वजनाची खंडेरायाची खंडा तलवार उचलली होती. त्याचाही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील भूमिकेसाठी घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं होतं. 

सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्राजक्ता काही महिन्यांपूर्वी 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या वादामुळे प्रकाशझोतात आली होती. या मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्तावर काही आरोप केले होते. त्यानंतर प्राजक्ताने या मालिकेला रामराम केला.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT