prajakta mali cute video viral with her niece on instagram SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: 'म्हणून ती माझे केस विंचरते', प्राजक्ताचा व्हिडीओ व्हायरल, भाची म्हणते.. 'तुझ्या केसातला गुंता'

प्राजक्ता माळीने तिच्या भाचीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय

Devendra Jadhav

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्यजत्रेमुळे सध्या घराघरात पोहोचली आहे. याआधी प्राजक्ताने जुळुन येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला अशा मालिकांमधून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातले विविध अपडेट्स शेअर करत असते.

नुकताच प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत प्राजक्ताने तिच्या भाचीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. काय आहे हा व्हिडीओ. जाणून घ्या.

(prajakta mali cute video viral with her niece on instagram)

प्राजक्ता आत्तू - भाचीमधला गोड संवाद

प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओत प्राजक्ताची भाची तिला म्हणते, "तुला असं मागून करता येत नाही का?" प्राजक्ता तिला नाही म्हणते. पुढे भाची तिचे केस विंचरत असते.

प्राजक्ता तिला म्हणते,"गुंता काढ हा माझ्या केसातला नीट", त्यावर भाची म्हणते, "गुंताच काढते गं. छान काढते हा आत्तू." आत्या - भाचीचा हा गोड संवाद सध्या चांगलाच चर्चेत आहे.

म्हणून भाची माझे केस विंचरते, प्राजक्ताचा खुलासा

मला मानेवरचे केस नीट विंचरता येत नसावेत, असं तीला वाटतं. म्हणून मी बाहेर जाताना आणि बाहेरून आल्यावर ती माझे केस विंचरते. म्हणून मी घरातून जायची आणि यायची ती वाट बघते..Video काढतेय कळलं की लपते. (मध्ये काय बोललीस ते मलाही नाही कळलय अजून) शिवप्रिया होगं आत्तू ही तिची आवडती लाईन आहे.

प्राजक्ताचं वर्कफ्रंट

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सुत्रसंचालन करतेय. याशिवाय प्राजक्ताचा काहीच दिवसांपुर्वी तीन अडकून सीताराम हा मराठी सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर तितका चालला नाही तरीही प्रेक्षकांना हा सिनेमा खुप आवडला.

प्राजक्ताने काहीच दिवसांपुर्वी जुळून येती रेशीमगाठी मालिकेला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मालिकेची आठवण जागवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT