Prajakta Mali Video Prajakta Mali At Karjat Farmhouse Esakal
मनोरंजन

Prajakta Mali Video: कर्जतचा धबधबा, अन् धम्माल मज्जा.. प्राजक्ता माळीची 'सहकुटुंब सहपरिवार' फॅमिली पिकनीक

सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या प्राजक्तानं तिच्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे.

Vaishali Patil

Prajakta Mali At Karjat Farmhouse: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती चाहत्यांची लाडकी आहे. तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.

नेटकरी तिला फॉलोही करतात आणि लाईकही करतात. प्राजक्तानं नुकतच कर्जतला फार्महाउस घेतला आहे. तिच्या या फार्महाउसची चर्चा सध्या खुप रंगली आहे, कर्जतला निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताने नवीन घर घेतलं असुन घराला प्राजक्तकुंज हे नाव दिलंय.

तिने यापुर्वी त्याचे फोटो शेयर करुन कर्ज काढून तो फार्महाउस घेतल्यातचं सांगितलं होत. आता तिनं हा फार्महाउस इतर पर्यटकांसाठीही खुला केला आहे.

आता ती या फार्महाउसवर तिच्या कुटूंबासोबत विकेंड एन्जॉय करतांना दिसली. सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या प्राजक्तानं तिच्या इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या फॅमिलीसोबत काही फोटो शेयर केले आहेत. या फोटत ती तिच्या फार्महाउसवर पावसाचा आनंद घेताना दिसतेय.

तिने शेयर केलेल्या फोटोत ती तिच्या संपुर्ण कुटुंबासोबत दिसली. प्राजक्ता ती अगदी लहान मुलासारखी झऱ्यात खेळतांना दिसत आहे. झऱ्यात कधी ती पाण्यासोबत खेळते तर कधी फॅमिलीसोबत मस्ती करतांना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, निसर्ग तुम्हाला आनंदित करतो. पण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद हीच बेस्ट थेरपी आहे. #झरे #छोटेधबधबे #घराजवळ असे अनेक हॅशटॅग तिनं या पोस्टला वापरले आहेत.

काही वेळातच प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिला तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतांना पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना तिचा हेवा वाटतं आहे.

'सुंदर धबधबे आणि खूप गोड फॅमिली.', 'खळखळत वाहणाऱ्या झऱ्या प्रमाणे चेहेऱ्यावर ओसंडून वाहणारे हास्य सांगत आहे किती आनंद वाटतोय, निसर्ग आणि परिवार सोबत..अजून काय ते सुख असते', 'अस्सलं मराठी स्वॅग' अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT