Prajakta Mali Instagram
मनोरंजन

'जीव वाचला पाहिजे...', प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहते झाले भावूक

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या पोस्टमुळे अनेकदा चर्चेत आलेली पहायला मिळते.

प्रणाली मोरे

'रानबाजार'चा तो टिझर रिलीज झाला अन् प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव मोठ्या प्रमाणत चर्चेत आलं. आता असं नाही की अभिनेत्री म्हणून प्राजक्ताला प्रसिद्धि याआधी मिळाली नव्हती. पण आतापर्यंत नेहमी सोज्वळ भूमिका करणाऱ्या प्राजक्ताला 'रानबाजार'मधील भूमिकेनं ट्रोलिंगच्या अर्वाच्य भाषेचा देखील सामना करावा लागला,अन् तशी विरोधातली प्रसिद्धि तिच्या वाटेला आली.(Prajakta Mali Post)

अर्थात सोशल मीडियावर सामाजिक,राजकीय मुद्द्यांवर प्राजक्ता नेहमीच भाष्य करते अन् त्यावेळी तिचं कौतूकही होतं अनेकदा आणि टिकाही होते तिच्यावर. पण त्याचा सूर वेगळा असतो. 'रानबाजार'नं मात्र प्राजक्ताला खूप तिखट भाषा सहन करावी लागली हे ही तितकंच खरंय. असो, प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. मुलाखतीत ती नेहमीच म्हणत आलीय की तिला भूमिका मांडायला आवडते,मग विषय सामाजिक असो की राजकीय. आता तिची नवीन एक पोस्ट चर्चेत आहे. ज्यात ती म्हणतेय,''जीव वाचायला हवा....'' तिच्या या पोस्टमुळे चाहते मात्र भावूक होऊन प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नेमकं का म्हणाली प्राजक्ता असं. चला जाणून घेऊया.

प्राजक्ता माळीचा सध्या Y सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिच्यासोबत मुक्ता बर्वे देखील मुख्य भूमिकेत आहे. स्त्री केंद्रित विषयावर आधारित असलेला हा सिनेमा महिलांमध्ये चांगलीच पसंती मिळवत आहे. प्राजक्तानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर करीत लिहिलं आहे की,''आई पप्पा - तुमचे किती आणि कसे आभार मानू?
आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर सोहळा केलात…. 😍''
.#मीआणिमाझ्याभाच्या ♥️
#coremalifamily
#savegirlchild
#y
@ythefilm
.
चित्रपट पोचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे...

तर स्त्री जन्माचा उद्धार करणारी ही पोस्ट प्राजक्तानं खास आपल्या सिनेमातील आशय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी केली आहे. अभिनेत्री पोस्टच्या माध्यमातून कळकळीनं लोकांना स्त्री गर्भाला मारू नका असं सांगतेय. कलाकारांना नेहमीच आपण धारेवर धरतो पण त्यांच्या या अशा चांगल्या पोस्टचा किती आपण सारे मनापासून विचार करत त्याला उचलून धरतो,ते विचार आत्मसात करतो. हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तेव्हा चला प्राजक्ताच्या, 'जीव वाचला पाहिजे..' या पोस्टला मनापासून दाद देऊया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT