Prajakta Mali-Raj Thackeray google
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ताची नवी इनिंग.. राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'प्राजक्तराज' चे लॉन्चिंग

प्राजक्ता माळीच्या नव्या ज्वेलरी ब्रॅन्डचं नाव 'प्राजक्तराज' असं आहे.

प्रणाली मोरे

Prajakta Mali: मराठी इंडस्ट्रीत सध्या चर्चेतलं नाव आहे ते प्राजक्ता माळी. प्राजक्ताचे तिच्या मालिका,सिनेमातील भूमिकांमुळे असंख्य चाहते आहेतच शिवाय सोशल मीडियावरही तिचं मोठं फॅन फॉलोइंग आहे.

'रानबाजार' या वेबसिरीजमुळे तिची जितकी प्रशंसा झाली तितकंच त्यातील बोल्ड भूमिकेमुळे तिला ट्रोलही केलं गेलं. अर्थात सोशल मीडियावरही ती अनेकदा तिच्या राजकीय-सामाजिक भूमिका मांडते तेव्हा तिला ट्रोल केलं जातं.

पण असं असलं तरी तिच्यावर भरभरुन प्रेम करणारे लाखो चाहते तिच्या हेटर्सपेक्षा कैक पटींन जास्त असतील. (Prajakta Mali Jwellery brand launch by raj thackeray )

आता प्राजक्तानं अभिनयासोबतच एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. प्राजक्ता माळीनं स्वतःचा ज्वेलरी ब्रॅन्ड लॉन्च केला आहे. ज्याचं उद्धाटनं मनसे प्रमुख श्री. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलं. प्राजक्ताच्या या ब्रॅन्डचं नाव 'प्राजक्तराज' असे आहे. आज ६ जानेवारी,२०२३ रोजी प्राजक्तानं मुंबईत एका सोहळ्यात या ब्रॅन्डचं उद्घाटनं केलं.

या ब्रॅन्डच्या माध्यमातून आता प्राजक्ता वेगवेगळ्या पारंपरिक दागिन्यांचा साज घेऊन लोकांच्या भेटीस येत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता आपल्या या ब्रॅन्डच्या लॉन्चिंग सोहळ्याचं प्रमोशन करताना दिसली खरं,पण तिनं उद्योगविश्वातील आपल्या या नव्या भरारीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे अचानक आज लॉन्चिंग झाल्यानंतर प्राजक्ताचं महिला उद्योग विश्वातील पाऊल तिच्या चाहत्यांना आनंद देणारं ठरलं.

सिनेमा,मालिका,वेबसिरीज यामध्ये वेगवेगळी पात्र रंगवून प्रेक्षकांना मोहात टाकणारी प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना देखील तितकीच प्रेक्षकांना आवडते. अभिनयासोबतच आपली नृत्याची आवडही तिनं जोपासली आहे. तसंच, ती एक उत्तम कवयित्री देखील आहे. तिचं 'प्राजक्त प्रभा' हे कवितांचे पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT