Prajakta Mali Instagram
मनोरंजन

'भारतीय बलात्कार संस्कृती...' प्राजक्ता माळी हे काय म्हणतेय?

रानबाजार नंतर प्राजक्ता माळी आता तिच्या 'भारतीय बलात्कार संस्कृतीवरील भाष्य' यामुळे पुन्हा चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

'बलात्कार संस्कृती'(Rape Culture) म्हणजे 'बलात्कार संस्कृती' ही जगाच्या जवळपास प्रत्येक भागात आणि प्रत्येक समाजात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. पण संस्कृती हे केवळ सुंदर, रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या परंपरा आणि चालीरीतींचे नाव नाही. बलात्कार संस्कृती' म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था ज्यामध्ये लोक बलात्काराच्या पीडितेला पाठिंबा देण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या प्रकारे बलात्कार करणाऱ्याच्या समर्थनार्थ उभे राहतात.(Prajakta Mali New Rada Rada marathi talk show)

बलात्कार संस्कृतीचा संदर्भ आहे ती परंपरा ज्यामध्ये बलात्कारासाठी स्त्रीला जबाबदार धरले जाते. 'बलात्कार संस्कृती' म्हणजे अशी संस्कृती ज्यामध्ये बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचार या गंभीर गुन्ह्यांऐवजी किरकोळ आणि दैनंदिन घटना म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला जातो.

Marathi Movie- Rada Rada...

अशाच भारतीय बलात्कार संस्कृतीविषयी भाष्य करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे व्हीमास मराठीचा राडा राडा या टॉक शो अंतर्गत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बलात्कार संस्कृतीला आळा घालण्यासाठी या अभिनेत्रींनी दिलेले सल्ले साऱ्या भारतीयांना नक्कीच मोलाचा संदेश देऊन जातील यांत शंकाच नाही.

प्राजक्ता आणि पूर्वा व्हीमास मराठीच्या राडा राडा या शो अंतर्गत प्रेक्षकांना सामाजिक विषय कसा हाताळायचा याचे उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. व्हीमास मराठीचा राडा राडा हा शो प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन चालू विषय हाताळणार असून नवनव्या कलाकारांचे, विचारवंताचे मत या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांना कळणार आहे.

सत्य परिस्थीती सांगणारा व्यंगात्मक शो मधून प्राजक्ता आणि पूर्वाच एक वेगळंच रूप तुम्हाला सामाजिक विषय हाताळताना पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT