Prajakta Mali Instagram
मनोरंजन

हिमाचलला गेलेली प्राजक्ता माळी म्हणतेय,'महाराष्ट्रात पळून यावंसं वाटतंय'

प्राजक्ता गेल्या पाच दिवसांपासून हिमाचलमध्ये सोलो ट्रिपचा आनंद घेत होती.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांपासून वेबसिरीजच्या दुनियेतच नाही तर अनेक कार्यक्रमातून,मुलाखतींमधून आणि सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर ज्या मराठी अभिनेत्रीची सर्वात अधिक चर्चा आहे ती म्हणजे प्राजक्ता माळी(Prajakta Mali). 'रानबाजार'(Ranbazar) मधील तिनं साकारलेल्या भूमिकेचं जेवढं कौतूक झालं तेवढीच तिच्यावर टिकाही झाली. पण या सर्वच गोष्टींना तिनं खूप चांगल्या पद्धतीनं तोंड दिलं. ना ट्रोलर्सला प्रतिउत्तर देताना तिचा आवाज चढला,ना मुलाखतीत तिरकस प्रश्नांना उत्तरं देताना तिची चिडचिड झाली. चेहऱ्यावर कायम हसू ठेवून तिनं अनेक तिखट टिकांना व्यवस्थित टोलवून लावलं. असो,सध्या प्राजक्ता माळी हिमाचल(Himachal) मध्ये सोलो ट्रिपला गेलीय हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. करण सध्या सोशल मीडियावर आपल्यापैकी अनेक जण तिला फॉलो करीत असतील. तर त्या हिमाचलमधनं तिनं आपल्या महाराष्ट्रासाठी(Maharashtra) प्रेमाचा संदेश धाडलाय. काय म्हणालीय प्राजक्ता?

त्याचं झालं असं की सध्या प्राजक्ताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो ब्रेकवर गेल्यानं खूप निवांत वेळ आहे. कारण सिनेमांपेंक्षा,वेबसिरीजपेक्षा छोट्या पडद्यासाठीचं शूटिंग खूप कटकटीचं असतं. नुसती धावपळ असते. त्यामुळे यातून निवांत वेळ मिळताच प्राजक्तानं हिमाचल गाठलं. तिथले सुंदर फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करीतच होती गेली काही दिवस. पण त्यातच आज तिनं एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की,'' मला महाराष्ट्र्रात पळून यावंस वाटतंय,शेवटी मी सह्याद्रीची मुलगी'' असं देखील तिनं म्हटलं आहे. तिची ती भावूक पोस्ट आम्ही बातमीत जोडत आहोत.

प्राजक्तानं हिमाचलचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, ''पण खरं सांगू कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. हो आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा…कसं होणार माझं''

प्राजक्ता गेल्या ५ दिवसांपासून हिमाचलच्या सुंदर निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आहे. पण आता महाराष्ट्राची आठवण तिला सतावत आहे. त्यामुळेच तिनं महाराष्ट्रासाठी खास पोस्ट लिहिलीय,ज्यामुळे तिचे चाहते मात्र तिचं कौतूक करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT