prajakta mali share photo with minister aditi tatkare  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: "प्राजक्ता! तुझ्या नशिबात राजकारणात", आदिती तटकरेंसोबत फोटो पोस्ट करताच प्राजक्ताच्या फॅन्सच्या कमेंट्स

प्राजक्ता माळीने आदिती तटकरेंसोबत फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्यात

Devendra Jadhav

Prajakta Mali News: प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावरील चर्चेतील अभिनेत्री. प्राजक्ताला आपण अनेक सिनेमे, मालिका आणि वेबसिरीजमधून पाहिलंय. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतेय.

प्राजक्ताने नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो प्राजक्ताने खास सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

(prajakta mali share photo with minister aditi tatkare)

प्राजक्ताने आदिती तटकरेंसोबत फोटो पोस्ट करुन लिहीलंय की, "महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य. की आयुष्यभरासाठी मित्र? मा. आदिती ताई तटकरे. स्वतः महिला आणि नाव “आदिती”च महिलांचे प्रश्न जाणून; स्त्री शक्तीस आधारां खंबीर, झझावती नेतृत्व त्यांच्यात आहे. बरोबरीनं. लेझर शार्प फोकस, असाधारण स्मृती, दयाळू स्वभाव आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता; मला खूप प्रेरणा देते."

प्राजक्ता पुढे सांगते, "त्यांना जवळून ओळखता आलं याचा मला आनंद आहे.

काल रात्री आमची हसून हसून पुरेवाट झाली.

आमची स्वभाव खूप जुळतो. आपण महिला सक्षमीकरणासाठी लवकरच एकत्र काम केले पाहिजे. आपण करावं का?"

प्राजक्ता, तुझ्या नशिबात राजकारणात प्रवेश आहे असं दिसतंय, प्राजक्ताच्या एका फॅनने अशी कमेंट केलीय जी चर्चेत आहे.

प्राजक्ताने सुद्धा तिच्या पोस्टच्या शेवटी, आपण महिला सक्षमीकरणासाठी लवकरच एकत्र काम केले पाहिजे. आपण करावं का? असं कॅप्शन दिल्याने येत्या काळात प्राजक्ताने राजकारणात प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT