Prajakta Mali shared bold hot photos and said If you are in a good shape, flaunt it sakal
मनोरंजन

Prajakta Mali: आहे तर दाखवायलाच हवं.. हे काय बोलून गेली प्राजक्ता माळी..

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चांगलीच ट्रॉल झाली आहे.

नीलेश अडसूळ

Prajaktta Mali: मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यंदा तिची पोस्ट तीला महागात पडली आहे. प्राजक्ताने काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. या फोटोला कॅप्शनही तितकेच भन्नाट दिले आहे. त्यामुळे प्राजक्ता आता भलतील ट्रोल होत आहे.

(Prajakta Mali shared bold hot photos and said If you are in a good shape, flaunt it)

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. तिची 'रानबाजार' वेब सिरिज असो 'वाय' सिनेमा किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वी ती लंडन मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'रानबाजार' वेब सिरिजवेळी तिच्या बोल्ड लुकमुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली. आज पुन्हा तिच्या बोल्डनेस वर चाहते नाराज झाले आहेत.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा हाय स्टाइलचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. बन हेअरस्टाइल करत प्राजक्ताने खास लूक केला आहे. यावेळी तिने हा ड्रेस पायाच्या वरपर्यंत घेऊन काही पोज दिल्या आहेत. हाच तिचा बोल्ड ड्रेस आणि बोल्ड लुक प्राजक्ताच्या अंगाशी येणार दिसतंय. कारण तिच्यावर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे यावर तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहेत.

'जर तुमचे शरीर सुंदर शेप मध्ये असेल तर बिनधास्त दाखवायला हवं' असं ती म्हंटली आहे. पण 'तुझ्याकडून ही अपेक्षा नाही', 'तुझी सई ताम्हणकर होत चाललीय', 'तुला अशा बोल्डनेसची गरज नाही', 'तुझ्याविषयीचा आदर कमी होत चाललंय' अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंवर आल्या आहेत. तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT