prajakta mali talk about first time she purposed to boy love life relation sakal
मनोरंजन

Prajakta Mali: मलाच त्याला प्रपोज करावं लागलं, कारण.. प्राजक्तानं सांगितली पहिल्या प्रेमाची खास आठवण..

प्राजक्ता माळीने केला लव्ह लाईफबद्दल खुलासा..

नीलेश अडसूळ

Prajakta Mali: मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर, निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिचा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते.

नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. अभिनय, व्यवसाय आणि अध्यात्म अशा विविध गोष्टी सध्या ती हाताळत आहे. तिचे अनेक चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

त्यात प्राजक्ता आणि प्रेम हे एक वेगळच समीकरण आहे. मध्यंतरीही तिने तिच्या गुरूंना लग्न करावं की नाही याबाबत विचारलं होतं. तेव्हाही ती चर्चेत आली होती. आता मात्र तिने थेट प्रेमावर भाष्य केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत ती आपल्या पहिल्या प्रेमाविषयी बोलली आहे.

(prajakta mali talk about first time she purposed to boy love life relation)

प्राजक्ताने नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला एक मुलाखत दिली. यावेळी तिने पहील्या प्रेमाबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी, 'तू पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं होतं', असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर प्राजक्ताने एक भन्नाट उत्तर दिले. ती हसत हसत म्हणाली, 'मी प्रपोज नक्कीच केलं आहे. किंबहुना मलाच त्याला प्रपोज करावं लागलं, कारण माझ्या आजूबाजूला जी मुलं होती ती फारच साधी, सरळ होती', अशा शब्दात तिने आपली पहील्या प्रेमाची आठवण सांगितली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुढे ती म्हणाली, 'मी त्यांना डायरेक्ट प्रपोज केलं नव्हतं. तू बरा वाटतोस, चल मग बघू काही होतंय का, असं मी त्याला म्हटलं होतं,' असा किस्सा तिने सांगितला.

प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. याशिवाय तिचा एक चित्रपट प्रदर्शनसाठी सज्ज असून लवकरच तो प्रेक्षकांसमोर येईल अशी चर्चा आहे. सोबतच प्राजक्ता आता एक उद्योजिका म्हणूनही नवी ओळख मिळवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT