Prajakta Mali esakal
मनोरंजन

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने संघाच्या कार्यक्रमात नेसली ईको फ्रेंडली साडी, गडकरींचं गिफ्ट आहे खास, कारण..

या पोस्टमध्ये तिने गडकरींसोबतच्या भेटीतील अनुभव थोडक्यात शेअर केलाय.

साक्षी राऊत

Prajakta Mali Visits Gadkari's House : मराठी सिनेसृष्टीत स्वत:च्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. आणि राजकारणातील चर्चित व्यक्तिमत्व म्हणजे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी. योगायोगाने या दोघांची भेट घडली. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्ट्राग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने गडकरींसोबतच्या भेटीतील अनुभव थोडक्यात शेअर केलाय.

प्राजक्ता माळी वेगवेगळ्या कारणाने कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती कायम अॅक्टिव्ह असते. तिच्या साड्यांची चर्चा कायम महिलांमध्ये दिसून येते. अलीकडेच तिने तिच्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये तिने गडकरींसोबत झालेल्या भेटीनंतर त्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेल्या साडीचा उल्लेख केलाय.

नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त प्राजक्ता आणि गडकरींचा एकाच मंचावर उपस्थित राहण्याचा योग काही कारणाने जुळून येता येता राहिला. त्यावेळी प्राजक्ताने कार्यक्रमाच्या आयोजकांना एक छोटीशी विनंती केली होती. ती अशी की,"सहज गडकरी साहेबांची भेट शक्य झाल्यास मला फार आवडेल." हे कळताच गडकरींनी तात्काळ प्राजक्ताला वेळ दिला.

या भेटीत महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील काही पुढील कार्यक्रम, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग अशा बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. यावेळी गडकरी प्राजक्ताची हास्यजत्रा बघतात हे कळल्यानं तिचा आनंद द्विगुणीत झाला. प्राजक्ताला यावेळी निघताना गडकरींनी यावेळी त्यांच्या घरातील देवीचे दर्शन घ्यायला लावले. सोबतच त्यांच्या कामावर लिहीलेली ८-९ पुस्तकं दिली.

विशेष म्हणजे या भेटीत गडकरींनी प्राजक्ताला नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. ही साडी प्राजक्ताने विजयादशमीच्या उत्सवातसुद्धा नेसली होती. या भेटवस्तूबाबत प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये खास उल्लेख केला आहे. "आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार." असे लिहीत तिने गडकरींचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT