prajakta mali 
मनोरंजन

'आजूबाजूचे सगळेच लग्न करतायत, म्हटलं आपणही.. '

सकाळ ऑनलाइन

अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे  प्राजक्ता माळीने तिच्या मोहक अदांमुळे अणि नृत्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तसेच तिच्या आयुष्यातील विविध घडामोडींबद्दल ती सोशल मिडीयावर पोस्ट करते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 
 
या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर डान्स करताना दिसतेय. 'आजूबाजूला सगळेच लग्न करतायत किंवा उत्तरेला फिरायला जात आहेत. म्हटलं आपणही जे सहज शक्य आहे ते करूया. ऑफ टू द व्हेकेशन. हिमाचल प्रदेश' असं हटके कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. प्राजक्ता हिमाचल प्रदेशला फिरायला गेली असून तिथले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. 

फिरण्याची प्रचंड आवड असलेल्या प्राजक्ताने 'मस्त महाराष्ट्र' या कार्यक्रमाचं सूत्रसंचानल केलं होतं. या कार्यक्रमासाठी ती महाराष्ट्रातील विविध ठिकाणांना भेट देत होती. जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कॉमेडी शोचे सूत्रसंचालनही प्राजक्तानेच केले. फिरण्यासोबतच प्राजक्ताला नृत्याचीही फार आवड आहे. हम्पी, खो खो, ...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर, पार्टी या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Tourism: मध्य प्रदेश फिरायला जाणार असाल तर ही बातमी महत्त्वाची; पर्यटन क्षेत्रात होणार मोठे बदल; होमस्टे, जंगल सफारी आणि बरंच काही..

SCROLL FOR NEXT