Prajakta Mali Yoga Video,Bakasan
Prajakta Mali Yoga Video,Bakasan Instagram
मनोरंजन

Video: प्राजक्ताचं 'बकासन',हातांवर पेलून धरलं सर्वांग; पण ट्रोलर्स म्हणाले,'आधी...'

प्रणाली मोरे

Prajakta Mali: प्राजक्ता माळी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती नेहमीच आपल्याविषयी आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. मग अगदी सिनेमासंदर्भातच नाही तर तिच्या डे टू डे रुटिनमधील छोट्या-छोट्या इंट्रेस्टिंग गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच तिनं जीममध्ये योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अर्थात तिनं जे आसन करुन दाखवलं आहे ते खूप अवघड आसन असलं तरी खूप फायद्याचं आहे, या आसनाला बकासन म्हणतात.(Prajakta Mali Yoga Video,Bakasan)

प्राजक्ता माळीनं बकासन करताना व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''बकासन…
#mondaymotivation
याआधीही हे आसन करताना तुम्ही मला पाहिलंय पण; १२ counts आसन hold करणं आत्ता जमायला लागलं…
.
Yoga- Is all about, Organising your energy.
The best form of exercise 🎯.
#अष्टांगयोगा
And Not just exercise, part of life routine.
#backtopavillion #backonmat #साधक
#prajakttamali''

प्राजक्ताच्या या योगा व्हिडीओवर चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. कुणी कठीण आसन पेलल्यामुळे अभिनेत्रीचं कौतूक केलंय तर कुणी योगाभ्यासकानं आणखी परफेक्शननं तिला बकासन करण्याचा सल्ला दिला आहे. तर कुणी ,'आधी फरसाण खायचं अन् मग योगा करायचा..' असं म्हणत प्राजक्ताला ट्रोलही केलं आहे.

प्राजक्तानं केलेलं बकासन हे आसन आपण कधी केलंय का? अर्थात आपण योगा करत असाल तर ते शरीरासाठी उत्तमच आहे. पण य़ोग्य प्रशिक्षकासमोर किंवा त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊनच योगा करणं कधीही उत्तम. या आसनाचे अनेक फायदे पण काळजी मात्र नक्की घ्यायला हवी.

हे आसन दररोज केल्यास शरीर तंदुरुस्त आणि क्रियाशील बनते. बकासन म्हणजे बक आणि आसन. बकचा अर्थ होतो सारस ज्याला बगळाही म्हटले जाते. इंग्रजीत क्रेन पोज किंवा क्रो पाॅजच्या नावानेही ओळखले जाते. हे आसन करताना व्यक्ती बगळ्या समान होतो. याच कारणामुळे याला बकासन असे म्हटले जाते.

बकासन करताना घ्यावयाची काळजी

- उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे आसन करु नये.

- ज्या लोकांना हृदयसंबंधित त्रास होत असेल त्यांनी हे आसन करणे टाळावे.

- ज्यांना जास्त करुन खांद्यांचा त्रास होतो त्यांनीही हे आसन करु नये.

- हे आसन करताना संयम बाळगा आणि संतुलन ठेवा.

बकासन करण्याचे फायदे

- चेहऱ्याच्या मांसपेशी तंदुरुस्त होतात. त्याने चेहऱ्यावर तेज येते.

- जे हे आसन करतात त्यांना पोटाचे विकार कधीही होत नाहीत.

- हात, पायाच्या नाजूक मासपेशींना मजबूत करण्यासाठी तुम्ही हे आसन करु शकता.

- जर शरीरातील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही हे आसन करु शकता. शरीरही तंदुरुस्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT