AASHRAM 
मनोरंजन

‘आश्रम’ वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती, मिळाले तब्बल इतके कोटी व्ह्यूज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘राजनिती’, ‘चक्रव्ह्यूह’, ‘आरक्षण’ यांसारखे  वास्तववादी सिनेमे केल्यानंतर दिग्दर्शक प्रकाश झा यांनी वेब विश्वात पदार्पण केलं. ‘आश्रम’ ही त्यांनी दिग्दर्शित केलेली वेब सीरिज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिली. सुरुवातीपासूनंच नाव आणि बोल्ड दृश्य यांसारख्या कारणामुळे ती अडचणीत सापडली होती मात्र नोव्हेंबरमध्ये या सीरिजचा दुसरा भागदेखील रिलीज झाला. एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली ही सीरिज १०० कोटी व्ह्यूज मिळालेल्या सीरिजमध्ये सहभागी झाल्याचा दावा प्रकाश झा यांनी केला आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेबसिरीजची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आणि उत्सुकता पाहायला मिळाली. पहिला भाग वादात असून देखील याच दुसरा भाग रिलीज करण्यात आला. या दोन्हीची भागांचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेबसिरीजचा दुसरा भाग रिलीज होण्यापूर्वी पहिल्या भागाला ४० कोटी व्ह्यूज मिळाल्याची माहिती दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिली होती. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “जनतेवर थेट परिणाम करणारे सिनेमे किंवा सीरिज बनवल्यास, त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया येणं हे अपेक्षितच असतं. या सीरिजचे व्ह्यूज वाढतच गेले आणि जेव्हा १०० कोटींचा आकडा मी ऐकला, तेव्हा थक्कच झालो. लोकांना अशा प्रकारचं कथानक पाहायला आवडतं हे मला समजलं.”

तसं पाहायला गेलं तर या वेब सीरिजचा दुसरा भागसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली होती. जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी 'आश्रम' सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या सीरिजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप त्यांनी केलाय. आता तर प्रेक्षकांना तिस-या भागाची देखील उत्सुकता लागुन राहिली आहे. 

prakash jha claims aashram has raked in 100 crore views people love to watch such content 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT