prakash jha on karni sena notice 
मनोरंजन

'आश्रम 2' प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात, करणी सेनेच्या नोटीसला प्रकाश झा यांचं उत्तर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता बॉबी देओल याची आगामी ‘आश्रम 2’ ही वेब सीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. ‘आश्रम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केलं असून त्याची ‘आश्रम 2’ ही नवीन सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करणी सेनेच्या राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झा यांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच प्रकाश झा यांच्यासोबत ‘एमएक्स प्लेअर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मलादेखील नोटीस बजावली आहे. 'आश्रम' या वेब सीरिजमधून धार्मिक परंपरा, प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि आश्रम धर्म यांच्याविषयी चुकीचा समज परसवला जात असल्याचं करणी सेनेने त्यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटलंय.

करणी सेनेच्या या नोटीसला आता दिग्दर्शक प्रकाश झा यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश झा यांनी कायदेशीर उत्तर न देता एक स्टेटमेंट रिलीज केलं आहे. “त्यांनी केलेल्या मागणीवर उत्तर देणारा मी कोणी नाही. या सीरिजच्या पहिल्या सीजनला ४०० मिलिअन व्ह्युज मिळाले होते. मला वाटतं कोणताही निर्णय घेण्यासाठी प्रेक्षक समर्थ आहेत. त्यामुळे हा विषय आपण प्रेक्षकांवरच सोडून देऊयात. तेच योग्य तो निर्णय घेतील”, असं प्रकाश झा म्हणाले.

नुकताच ‘आश्रम 2- द डार्क साइड’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये हिंदू चालीरिती आणि आश्रम व्यवस्थेविषयी भाष्य करण्यात आलं होतं. ‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही वेबसीरिज ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहुन प्रेक्षकांमध्ये याविषयी आणखीनंच उत्सुकता निर्माण झाल्याचं चित्र आहे.   

prakash jha responds of karni sena legal notice for his web series ashram  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

SCROLL FOR NEXT