prakash raj  
मनोरंजन

सिंघमच्या जयकांत शिकरेला गंभीर दुखापत

याबाबत सोशल मीडियावर वेगानं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - केवळ दाक्षिणात्य south film industry नाही तर बॉलीवूडमध्येही bollywood आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या सिंघम फेम singham fame जयकांत शिकरे jaykant shikare अर्थात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज prakash raj यांना गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत सोशल मीडियावर वेगानं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी व्टिट करुन आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्यांना झालेल्या अपघातात फ्रॅक्चर झाले आहे.

आपल्या परखड मतांसाठी प्रख्यात असणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रकाश राज यांची ओळख आहे. ते नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहे. यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या सरकारी धोरणांवर सडकून टीका केली आहे. त्यासाठी त्यांनाही ट्रोल करण्यात आले आहे. मात्र त्याचा काही एक परिणाम त्यांच्या स्वभावावर झालेला नाही. प्रकाश राज हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी परिचित आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना दुखापत झाली आहे. त्यात त्यांना फ्रॅक्चरही झाले आहे. त्यांनी व्टिट करुन जी माहिती दिली आहे त्यात आपण आपल्या डॉक्टर मित्राकडे उपचारासाठी चाललो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सिंघम या चित्रपटात त्यांनी साकारलेला जयकांत शिकरे हा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे त्यांना बॉलीवूडमध्येही मोठ्या प्रमाणावर ग्लॅमर मिळाल्याचे दिसून आले आहे. प्रकाश राज यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, एक छोटासा अपघात आहे आणि एक छोटसं फ्रॅक्चरही. मी आता माझा मित्र डॉ.गुरुवरेड्डीकडे चाललो आहे. लवकरच बरा होईल. तेव्हा चिंता करण्याचे काही कारण नाही. बस दुआ में याद रखो असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पाच महिन्याच्या गर्भवतीनं जीवन संपवलं; शेवटच्या पत्रात धक्कादायक खुलासा, नेमकं काय लिहिलं?

सैराटमध्ये परश्यासोबत पहिल्यांदा दिलेल्या इंटिमेंट सीन बद्दल बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली...'मी घाबरुन...'

Latest Marathi News Live Update : शेळ्या-बोकडांवर पाळत ठेवत चोरी करणाऱ्या बोकड चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक

Rule Change: एलपीजी, पॅन-आधार अन्...; १ जानेवारी २०२६ पासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीतील पथसंचलनासाठी अक्षता मुळे हिची निवड; पाच वर्षांनंतर मिळाला मान

SCROLL FOR NEXT