Prakash Raj esakal
मनोरंजन

देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

भगवान राम, हनुमान आणि अशोक स्तंभाची फोटो शेअर करत...

सकाळ डिजिटल टीम

नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. विरोधी राजकीय पक्षांचे म्हणणे आहे, की केंद्र सरकारने अशोक स्तंभात (Ashok Pillar) बदल केला असून हा आपल्या इतिहासाचा अपमान आहे. मूळ स्तंभात सिंहांचे चेहरे शांत होती. दुसरीकडे नवीन स्तंभात सिंह रागीट दाखवले गेले आहेत. अशोक स्तंभाविषयी वाद सुरु असताना चित्रपट अभिनेता प्रकाश राजने (Prakash Raj) ट्विटवर एक छायाचित्र शेअर करुन प्रश्न विचारला आहे.

प्रकाश राज यांनी जे छायाचित्र शेअर केले आहे. त्यात जुने आणि नवीन भगवान राम, जुने आणि नवीन हनुमान आणि जुने-नवीन अशोक स्तंभाचे छायाचित्रात फरक दाखवला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने विचारले, आपण कुठे चाललो आहोत? फक्त विचारत आहे. प्रकाश राज यांच्या ट्विटवर युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिन नावाच्या यूजरने लिहिले, श्रीरामाने रावणाचा वध हसत केलेला नाही. हनुमानजीने पर्वत आशीर्वाद मुद्रेत उचलले नाही. सिंह गर्जना करतो, तेव्हा तो शांत नसतो. तुमचे आकलन चुकीच आणि तर्कसंगत कुठूनच दिसत नाही. इतिहास आणि धर्माचे ज्ञान घे मग पुन्हा बोला. जय श्रीराम (Lord Ram), जय वीर बजरंगबली !

श्रीराम श्रीधरने येशू ख्रिस्त यांचा जुना आणि नवीन छायाचित्र शेअर करत लिहिले, तुम्ही केवळ हिंदूंनाच का विचारता? तुम्हाला हे दिसत नाही का ? सचिन नावाचा यूजर म्हणतो, नवा हिंदुस्तान ! जे लोक राष्ट्रहिताविरोधात आहेत, त्यांनी घाबरणे आणि ट्विट करण्याची गरज आहे. जसे तुम्ही ट्विट करत आहात. ममता नावाची यूजर सचिनला प्रश्न करते राष्ट्रहित कि धर्महित?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT