Pramod Lokhande popular Marathi Singer passed away a 
मनोरंजन

Pramod Lokhande : 'नका करु नाद जयभीमवाल्यांचा' फेम गायक प्रमोद लोखंडे कालवश

अहमदपूर तालुक्यातील मौजे नागठाणा येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध गायक प्रमोद श्रीहरी लोखंडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

Pramod Lokhande Passed Away : अहमदपूर तालुक्यातील मौजे नागठाणा येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध गायक प्रमोद श्रीहरी लोखंडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. प्रमोद लोखंडे यांच्या निधनाने तालुक्यातील एक उत्कृष्ट कलाकार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मौजे नागठाणा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

आपल्या वेगळ्या शैलीतील गायकीनं त्यांनी चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्यांच्या जाण्यानं मराठी संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मौजे नागठाणा सारख्या खेडेगावांमध्ये जन्म झालेल्या आणि कला शाखेतील पदवीधर असलेल्या प्रमोद लोखंडे यांना लहानपणापासून गायनाची आवड होती. या गायनाच्या कलेचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रमोद लोखंडे यांनी गायनाला सुरुवात केली.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तालुक्यातील किनगाव येथे प्राथमिक शिक्षण चालू असताना इयत्ता सहावीच्या वर्गापासून ते मुंबई येथे त्यांच्या मामाकडे शिक्षणाला म्हणून गेले. त्याठिकाणी त्यांना प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा सहवास लाभला. त्यांनी गायनासह तबला, पेटी, ढोलकी, हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेतले.

मुंबईला चार वर्ष राहिल्यानंतर परत ते आपल्या तालुक्यात आले. त्यांनी सुरुवातीला भीम गीत गायनाचे लहान मोठे कार्यक्रम चालू केले. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या प्रमोद लोखंडे यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात हजार पेक्षा अधिक भीम गीत गायनाचे कार्यक्रम केले. त्यांचे हे कार्यक्रम सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. ध्वनिमुद्रण करीत असलेल्या काही नामांकित कंपन्यां द्वारे त्यांचे गीत ध्वनिमुद्रित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT