Prarthana Behare esakal
मनोरंजन

Prarthana Behare : 'तू आमच्या मनातून उतरली!' प्रार्थनाचा 'तो' व्हिडिओ चाहत्यांची नाराजी

आताही तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे मात्र तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prarthana Behare Viral Video : मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या मधाळ सौंदर्यांन चाहत्यांना गुंगवून टाकणारी अभिनेत्री म्हणून प्रार्थनाचे नाव घेता येईल. ती नेहमीच तिच्या लुकची दखल चाहत्यांना, नेटकऱ्यांना घ्यायला लावते. आताही तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे मात्र तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रार्थनाचा तो व्हिडिओ आणि तसले हावभाव पाहून शेवटी नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. प्रार्थना असे काही करु शकते हे तिच्या चाहत्यांना अपेक्षित नव्हते. तिचा बोल्ड अंदाज काही जणांना कमालीचा आवडला आहे. तर काहींनी नेहमीप्रमाणे प्रार्थनाला ट्रोल देखील केले आहे. तुला नेमकं काय झाले आहे, पोटात मळमळते आहे का, अशा प्रकारचे प्रश्न तिला विचारले आहेत.

Also Read - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की

यापूर्वी देखील प्रार्थना बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. मात्र तिचा आताचा लूक हा भलताच धक्कादायक आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला बोलण्याची आयतीच संधी मिळाली आहे. एकानं तर प्रार्थनाला तू कंडोमची जाहिरात करते की काय असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्यानं तर थेट तिच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करुन अश्लील भाषेत तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली प्रार्थना तिच्या अशाप्रकारच्या व्हिडिओमुळे चाहत्यांच्या मनातून उतरल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रार्थनानं केस मोकळे सोडले आहेत. आणि त्यात तिचे हावभाव भलत्याच स्वरुपाचे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

एका नेटकऱ्यानं तर आपण जेव्हा प्रार्थनाचा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला ती एका कंडोमची जाहिरात वाटल्याचे म्हटले आहे. त्यावरुन अनेकांनी प्रार्थनाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT