prarthana behere, sankarshan karhade, myra vaikul, shreyas talpade shared post after shoot last scene of majhi tujhi reshimgath serial sakal
मनोरंजन

शेवटच्या सिननंतर कलाकार भावूक; 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार निरोप..

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून घराघरात पोहोचलेले नेहा, यश, परी आता निरोप घेणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.

नीलेश अडसूळ

'झी' मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath ) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून वेगळी प्रेमकथा हाताळण्यात आली. लग्न झालेल्या आणि पदरी एक मुलगी असलेल्या नेहाची ही कथा आहे. नंतर ती एका उद्योगपतीच्या प्रेमात पडते, तो तिला स्वीकारतो आणि त्यांच्या सुखी सांसारला सुरुवात होते, अशा धाटणीचे हे कथानक आहे. ही मालिका चांगलीच चर्चेत असून यश आणि नेहा आणि परी ही तीनही पात्रे चाहत्यांच्या अत्यंत जवळची आहेत. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मायरा वायकुळ यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्यात आला. त्यावेळी कलाकारही भावूक झाले.
(prarthana behere, sankarshan karhade, myra vaikul, shreyas talpade shared post after shoot last scene of majhi tujhi reshimgath serial)

मालिका बंद होणार असल्याने ज्या प्रमाणे प्रेक्षक नाराज आहेत, त्यामुळे कलाकारही अत्यंत भावनिक झाले आहेत. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेचा शेवटचा सीन चित्रित झाल्यानंतर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट लिहिली आहे. अभिनेता श्रेयस तळपदेला मिठी मारतानाचा फोटो त्याने शेअर केला आहे. त्याला एक भावनिक कॅप्शनही दिले आहे. संकर्षण म्हणतो, 'बाय बाय यश समीर.. काल आम्ही यश आणि समीर म्हणुन “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतला शेवटचा सीन शूट केला .. मला माझ्या मित्राची , यशची .. माझ्या पात्राची , समीरची .. आणि त्यांच्या अफ्फलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील.. आय लव्ह यू श्रेयस तळपदे, मिस यू.. ही दोस्ती तुटायची नाय .. (खूप बोलायचंय .. सांगायचंय.. सविस्तर लिहिनच..)' ही पोस्ट त्याने केली आहे.

तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं 'अभी ना जाओ छोडकर' या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. परीची भूमिका साकारणाऱ्या मायरानं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहे. 'माझी तुझी रेशीमगाठी मालिकेचा ' परी ' म्हणून हा पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही काल घडल्यासारखाच वाटतोय आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ आज येऊन ठेपली सुद्धा... खुप भावूक झालेय या क्षणाला... पण म्हणता म्हणता मधले एक वर्ष कसे सरले ते कळलेच नाही; याचे कारण म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि मालिकेतील सर्व कलाकारांनी व संपुर्ण टीम ने ' परी ' ला आणि अर्थातच मला म्हणजेच मायरा वायकुळ ला दिलेले अफाट प्रेम!!... परीला तर प्रेक्षक वर्गाच्या सर्वच स्तरांतून भरभरून प्रेम मिळाले त्याबद्दल मी सर्वच रसिक प्रेक्षकांचे कायम ऋणी राहीन. आणि ' परी ' ही गोड भूमिका मला साकारायची संधी दिल्याबद्दल MTR च्या संपूर्ण तुमचे व झी मराठी वाहिनी चे मन: पुर्वक आभार! तुम्हा सर्वांचे माझ्यावरील प्रेम- आशीर्वाद असेच कायम राहो व माझ्याकडुन यापुढे छान छान कलाकृती घडत राहो अशी बाप्पाचरणी मनोमन प्रार्थना' अशी पोस्ट परीच्या सोशल मीडिया अकाऊंट वर करण्यात आली आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका बंद होत असल्यानं या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत. अनेक नेटकऱ्यानी याबाबत कमेंट करून कळवले आहे. प्रेक्षकांना ही मालिका अजून काही काळ बघायची होती. नेहा, यश, परी ही पात्र घराघरात पोहोचल्याने प्रेक्षकाही भावनिक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT