prasad jawade and akshay kelkar fight bigg boss marathi sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: तर.. हात उचलण्याच्या लायकीचा नाही रहणार.. प्रसाद-अक्षयमध्ये हाणामारी..

जेवणावरून प्रसाद आणि अक्षयमध्ये तुफान राडा..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता साठ दिवसांचा टप्पा पार झाला आहे. तर या पर्वाला पहिले टॉप 10 स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे घरामध्ये एकमेकांच्या विरोधात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक टास्क मध्ये आपल्याला चढाओढ दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपणच कसे सरस आहोत ही दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. परिणामी त्यावरून राडा घालायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. असाच एक राडा बिग बॉस मराठीच्या घरात झाला आहे. यावेळी अक्षय आणि प्रसाद यांच्यात जवळजवळ हाणामारी व्हायची बाकी आहे.

(prasad jawade and akshay kelkar fight bigg boss marathi)

बिग बॉस मराठीच्या घरात ऐरव्ही शांत आणि गोंधललेला दिसणारा प्रसाद आज मात्र भलताच रागात दिसणार आहे. घराचा कॅप्टन अक्षय आणि प्रसादचा तुफान राडा होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघे एकमेकांना मारायला धावून जात आहेत असे दिसून आले. घरातील सदस्य त्यांना थांबण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.

प्रसाद अक्षयला म्हणाला, स्वतः जेवलायस ना, आमच्या भुकेचे काय ? अक्षय म्हणाला, कॅप्टन काय जेवायला भरवेल का आता ? अक्षय म्हणाला, घेऊन जा ह्याला... प्रसाद म्हणाला, कोणाच्या बापाचा नोकर आहे का तो ? हे ऐकताच अक्षयला राग अनावर झाला तो म्हणाला, बापावर जाऊ नकोस... प्रसाद म्हणाला हात उचलास तर हात उचलण्याच्या लायकीचा नाही रहणार तू, एक सणसणीत मारेन तुला अशी.. त्यांच्या भांडनाने घरात एकदम सणसणी झाली आहे. हे भांडणं अजून किती वाढलं आणि पुढे काय घडलं ही आजच्या भागात कळेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT