prasad oak clean his house share funny video with wife manjiri oak sakal
मनोरंजन

Prasad Oak: धाक! बायकोने डोळे काय वटारले अन प्रसाद ओक चक्क फरशी पुसू लागला..

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने घरातली फरशी पुसतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

prasad oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. त्याचा 'धर्मवीर'चा सर्व प्रवास आता 'माझा आनंद' या पुस्तकातूनही समोर आला आहे. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. अशा प्रकाशझोतात असतानाच प्रसादने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तो चक्क घरातली जागा पुसताना दिसत आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया..

(prasad oak clean his house share funny video with wife manjiri oak)

प्रसादने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो बादली आणि कपडा घेऊन घरातली फरशी पुसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव ही बघण्यासारखे आहे. या रिल मध्ये त्याची बायको मंजिरी ओक देखील असून या व्हिडीओला दिलेल्या व्हॉईस ओव्हरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कारण प्रसादच्या या रीलने सर्वांनाच खळखळून हसवलं आहे.

'असं म्हणतात प्रत्येक जोडी स्वर्गात बनलेली असते. पण आता असं वाटतं की वरतीही काम नीट होत नाहीय.'असा गमतीशीर आवाज या व्हिडिओला दिला आहे. ही करताना प्रसाद घरातील लादी पुसत आहे. तर प्रसादची बायको मंजिरी मस्त मोबाइल घेऊन टाइमपास करताना दिसत आहे. मध्येच एकदा मंजिरी प्रसादकडे रागात पाहते आणि प्रसाद जागा पुसू लगतो' हा भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT