Nilu Phule Biography 
मनोरंजन

निळू फुलेंवर येणार चित्रपट! 'हा' अभिनेता करणार दिग्दर्शन

या चित्रपटाचे शूटींग कधी सुरू होईल याविषयी अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपट सृष्टीतील खलनायक म्हणून दिवंगत निळू फुले यांना खूपच लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून उत्तम खलनायक रंगवला. त्या निळू फुलेंचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने एका प्रसिद्ध अभिनेत्यांने त्यांच्यावर चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे.

prasad oak direct film

सध्या चंद्रमुखी या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत प्रसाद ओक म्हणतो, की निळूभाऊ... आज तुमचा वाढदिवस...!!! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं...अनुभवता आलं... तुमच्याकडून बरंच काही शिकलो... तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन "गुरु" च मानलं... तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली "गुरुदक्षिणा" असेल...!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ...!!!

चंद्रमुखी या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना प्रसाद ओक निळू फुलेंवर चित्रपट करणार असल्याने निळू फुले यांचे चाहते खूश झाले आहेत. अनेकांनी प्रसाद ओक यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाचे शूटींग कधी सुरू होईल याविषयी अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT