Prasad Oak Esakal
मनोरंजन

Prasad Oak:'तिचा मी लहानपणापासून चाहता..', प्रसाद ओकची 'ती' पोस्ट कोणासाठी?

प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच अशा काही पोस्ट करतो ज्या चर्चेत आलेल्या पहायला मिळतात.

प्रणाली मोरे

Prasad Oak: प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतो. त्याचे व्हिडीओज खूप भन्नाट असतात. यामध्ये अनेकदा त्याची पत्नी मंजिरी ओक त्याला साथ देताना दिसते.

नुकतीच त्यानं एक व्हिडीओ पोस्ट सोशल मीडियावर केली आहे,जिची चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये त्यानं त्याच्या एका आवडत्या अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे जिचा तो लहानपणापासून चाहता आहे. (Prasad Oak is a big fan of this actress video viral )

प्रसादचा ओकचा हा व्हिडीओ आहे एका पुरस्कार सोहळ्यातला. ज्यामध्ये त्याला 'धर्मवीर' या त्याच्या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यावेळी मंचावर दिसत आहे अभिनेत्री अश्विनी भावे..आणि तिच्याच हस्ते प्रसादला फिल्मफेअरची ब्लॅकलेडी मिळाली आहे.

प्रसादनं पोस्ट करत लिहिलं आहे,''अजून एक BLACK LADY घरात...!!!
ती पण अशा LADY च्या हातून
जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS...अश्विनी भावे...'' 

याच पुरस्कार सोहळ्यात मंचावर निवेदक-अभिनेता अमोल वाघ प्रसाद ओकला मिश्किलपणे म्हणताना दिसतोय,''आम्ही असं ऐकलंय की, 'तु 'धर्मवीर' सिनेमासाठी मिळालेले पुरस्कार ठेवण्यासाठी एक नवं घर घेतलं आहेस असं आम्ही ऐकलंय?' तेव्हा प्रसादनेही अचूक पलटवार करत म्हटलं की,''तथास्तू.. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होवो..''

सध्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये मराठी सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासारखा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

Jalgaon Municipal Elections : भाजपची मास्टरस्ट्रोक 'खेळी'! मंगेश चव्हाण प्रभारी तर सुरेश भोळे निवडणूक प्रमुख; महाजनांकडे 'रिमोट कंट्रोल'

Latest Marathi News Live Update: गाडीत मराठी अनाउन्समेंट न झाल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक

Nrusinhawadi Tax : थकबाकीदारांना सवलत, प्रामाणिक करदात्यांना ठेंगा; शासन निर्णयावर नागरिकांमध्ये संताप

Agriculture News : डाळिंब-उसाकडे फिरवली पाठ! कसमादे पट्ट्यात पुन्हा 'कांदा एके कांदा'चा नारा

SCROLL FOR NEXT