Prasad Oak play namdev vhatkar role in parinirvaan marathi movie based on dr babasaheb ambedkar sakal
मनोरंजन

Prasad Oak: प्रसाद ओकला मिळाली मोठी भूमिका, बाबासाहेब आंबेडकरांच्या 'परिनिर्वाण' चित्रपटात साकारणार..

अभिनेता प्रसाद ओकचं नशीबच उजळलं..

नीलेश अडसूळ

prasad oak in parinirvaan movie: हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक आता यशाच्या शिखरावर आहे. चंद्रमुखी आणि धर्मवीर या दमदार चित्रपटानंतर त्यांचे अनेक मोठे प्रोजेक्ट जाहीर केले आहेत.

डॉ. प्रभाकर पणाशीकर यांचा यांच्या बायोपीक मध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे तर निलू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तो स्वतः दिग्दर्शित करत आहे. अशातच त्याने एक मोठी घोषणा केली आहे.

(Prasad Oak play namdev vhatkar role in parinirvaan marathi movie based on dr babasaheb ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित 'परिनिर्वाण' चित्रपट येणार असल्याची बरीच चर्चा होती. अखेर त्याची घोषणा झाली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या मोशन पोस्टर अनावरण करण्यात आले.

यावेळी अभिनेता प्रसाद ओक देखील उपस्थित होता. तो कोणती भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्कंठा होती आणि अखेर ते जाहीर झाले आहे. या चित्रपटात प्रसाद ओक नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारणार आहे.

प्रसाद या सोहळ्याला उपस्थित होता यावेळी त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नामदेव व्हटकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. प्रसाद साकारत असलेले नामदेव व्हटकर एक किमयागार होते. कारण बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लोटलेला जनसागर या एकमेव अवलियाने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. त्यावेळी लाखो जनता रस्त्यावर उतरली. देशाचा श्वास रोखून धरणारा हा क्षण नामदेव व्हटकर यांनी चित्रित केला. जवळपास ३००० फुटांची रिळ व्हटकर यांनी तयार केली. त्यांच्यामुळेच आज आपण परिनिर्वाणाची दृश्य पाहू शकतो.

ते स्वतः उत्तम कॅमेरामॅन होते, ते दिग्दर्शक होते, निर्माते होते.. त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात काही चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसे ते राजकीय विश्वातही बरेच सक्रिय होते. ते आमदारही झाले आहेत. त्यांचा जीवनप्रवास या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका प्रसाद करणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्भवती आई अन् आठ वर्षांचा मुलगा... एका रात्रीत देशाबाहेर! न्यायालयातील थरारक क्षण, CJJ Suryakant यांचा मोदी सरकारला फक्त एक सवाल!

Solapur Crime : घरात कोणी नसताना १६ वर्षाच्या मुलीने लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने घेतला गळफास; तिने का उचललं टोकाचं पाऊल?

PMP Bus Pass : पास महागल्याने पीएमपीकडे पाठ; सहा महिन्यांत पासधारक ३२ टक्क्यांनी घटले

Kolhapur Election Update : प्रचार थांबताच कर्मचाऱ्यांची धावपळ! संपूर्ण शहरातून फलक-झेंडे हटवण्यात सरली रात्र

Solapur Crime:'एकतर्फी प्रेमातून चुलत मामेबहिणीचा खून'; तरुणास आजीवन जन्मठेप, राग अनावर झाला लग्नास नकार अन्..

SCROLL FOR NEXT