Prasad Oak shared reel post with wife manjiri oak about income tax and ED sakal
मनोरंजन

Prasad Oak: सरकारनी ठरवलं तर.. 'ईडी' संदर्भात प्रसादची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय..

प्रसाद ओकची 'ती' पोस्ट बरीच व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

Prasad Oak : सध्या सरकारी यंत्रणांचा बडगा कुणाच्या खांद्यावर कधी येईल हे काही सांगता येत नाही. अगदी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत लहान मुलांनाही इन्कम टॅक्स , ईडी हे शब्द माहीत झाले आहेत. गेल्या काही वर्षात या केंद्रीय संस्थांनी देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता कष्ट करून रोजची उपजीविका करणाऱ्या सामान्य माणसांनाही ईडीची भीती वाटू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसादने शेयर केलेली रील आता चर्चेचा विषय ठरत आहे.

(Prasad Oak shared reel post with wife manjiri oak about income tax and ED)

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे.

प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. कधी रील्स शेयर करत असतो तर कधी मनातल्या गोष्टी.. बऱ्याचदा तो सामाजिक विषयावर बोलत असतो. आज तर त्याने चक्क ईडी विषयी भाष्य केले आहे. पण हा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे, यामध्ये त्याने टीका करण्या ऐवजी एका गाण्यात गमतीशीरपणे तो व्यक्त झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर रील करण्यासाठी एका जुन्या गाण्याचा जोरदार वापर सुरू आहे. 'कमाता हू बहोत कुछ पर.. कमाई डूब जाती है.. कुछ इन्कम टॅक्स ले जाता है.. कुछ ईडी उडाती है ' असे या गाण्याचे बोल आहेत. 1954 साली आलेल्या 'अधिकार' चित्रपटातील गाणे आजच्या परिस्थितीला चांगलेच लागू होत आहे. त्यामुळे या गाण्यावर जोरदार रिल्स सुरू आहेत. त्यामुळे प्रसादलाही या गाण्यावर रील करण्याचा मोह आवरला नाही.

पण यात गंमत म्हणजे प्रसाद नाचता नाचता बायकोकडे जातो.. आणि शेवटी मंजिरीकडे हात करत म्हणतो.. 'कुछ ईडी उडाती है..' याशिवाय त्याने या रीलला एक कॅप्शनही दिले आहे. ''सरकारनी ठरवलं तर.. टॅक्स कंट्रोल होऊ शकतो... पण बायको????????'' असे प्रसाद गंमतीने म्हणाला आहे.

प्रसाद वेळोवेळी आपल्या बायकोची म्हणजे मंजिरी ओक हीची फिरकी घेत असतो. या निमित्ताने त्याने पुन्हा एक व्हिडिओ शेयर करत मंजिरीची टर उडवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : आठवले गटाचा दणका आंदोलनाची घेतली दखल

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT