prasad oak son sarthak complete his gradutaion  SAKAL
मनोरंजन

Prasad Oak: आयुष्याचं 'सार्थक' झालं! लेकाने घेतलेली भरारी पाहून प्रसाद म्हणाला, आम्हा सगळ्यांपासून लांब राहून...

प्रसाद ओकने सोशल मीडियावर अभिमानास्पद क्षण शेअर केलाय

Devendra Jadhav

Prasad Oak News: अभिनेता प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेता. प्रसादने आजवर अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. प्रसादचा काही महिन्यापुर्वी रिलीज झालेल्या धर्मवीर सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. या सिनेमात प्रसादने आनंद दिघेंची भूमिका साकारली.

मनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेल्या प्रसादच्या व्ययक्तिक आयुष्यात खास गोष्ट घडलीय. प्रसादच्या लेकाने परदेशात शिक्षणात प्रगती केलीय. काय घडलंय. आम्ही तुम्हाला सांगतो.

प्रसादच्या लेकाने शिक्षणात केली प्रगती

प्रसादने नुकतंच सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर केलेत. यात प्रसादची बायको मंजिरी आणि त्याची दोन्ही मुलं म्हणजेच सार्थक आणि मयंक पाहायला मिळत आहेत.

प्रसादचा मुलगा सार्थकने परदेशातील विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. सार्थकचा पदवीदान समारंभ झाला. प्रसादने हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

मुलाने केलेल्या प्रगतीबद्दल प्रसाद म्हणतो...

प्रसादचा मुलगा सार्थक परदेशात डिग्रीचं शिक्षण घेत होता. अखेर त्याने हे शिक्षण पूर्ण केलंय. मुलाने केलेल्या प्रगतीबद्दल प्रसाद लिहीतो, "सार्थक चा “पदवी प्रदान समारंभ” सार्थक…
आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास…!!! आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा…!!!"

प्रसादचे आगामी सिनेमे

प्रसादच्या लेकाने केलेल्या या कामगिरीबद्दल त्याचं अनेकांनी अभिनंदन केलंय. प्रसादच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या धर्मवीर 2 सिनेमाचं शूटींग करतोय. या सिनेमात तो पुन्हा एकदा आनंद दिघेंची भूमिका साकारतोय. याशिवाय प्रसाद स्वप्नील जोशीसोबत जिलबी सिनेमाचं शुटींग करतोय. काहीच दिवसांपुर्वी प्रसादने अमृता खानविलकरसोबत आगामी पठ्ठे बापूराव सिनेमाची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT