prasad and manjiri oak 
मनोरंजन

प्रसाद ओकच्या पत्नीचा 'खण'खणीत लूक

स्वाती वेमूल

अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक अभिनय क्षेत्रात नसली तरी चित्रपटविश्वात तिचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. मंजिरीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून प्रसाद ओकच्या चित्रपटांसाठीही तिने पडद्यामागील बरीच कामं केली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंजिरीचा फॅनफॉलोईंग मोठा आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती सतत फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. मंजिरीचा फॅशन सेन्स नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून तिच्या स्टाइल स्टेटमेंटवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो. सध्या खण साडीची ट्रेण्ड बाजारात असून मंजिरीनेही तिचा 'खण'खणीत लूक चाहत्यांसमोर सादर केला आहे. 

पारंपरिक खणाच्या साडीवर नक्षीकाम केलं की त्याला एक वेगळाच लूक येतो. अशा साड्यांमध्ये मंजिरीने बरेच फोटोशूट केले असून सोशल मीडियावर ते पोस्ट केले आहेत. खणाची साडी आणि त्यावर घुंगरुचे दागिने, असा मंजिरीचा लूक सोशल मीडियावर हिट ठरला. या फोटोशूटसाठी प्रसाद ओकनेही खणाचा कुर्ता परिधान केला होता. आणखी एका खणाच्या साडीवर स्टायलिश ब्लाऊजचा पर्याय निवडत मंजिरीने थोडा वेस्टर्न लूक नेटकऱ्यांसमोर आणला. या प्रत्येक लूकमध्ये मंजिरीचं सौंदर्य खुलून दिसत आहे. 

प्रसाद-मंजिरीची प्रेमकहाणी
मंजिरीने प्रसादच्या अॅक्टिंग वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. जवळपास तीन महिने हा वर्कशॉप चालला आणि त्यादरम्यानच प्रसाद-मंजिरीची चांगली मैत्री झाली. मात्र दोघांपैकी कोणीही दुसऱ्याला प्रपोज केलं नव्हतं किंवा लग्नासाठी मागणी घातली नव्हती. जसजसं या दोघांमध्ये प्रेमाची भावना वाढत गेली, तेव्हा त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. ७ जानेवारी १९९८ मध्ये या दोघांनी लग्न केलं. सुरुवातीला मंजिरीच्या कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध होता. पण नंतर कुटुंबीयांची मनं जिंकण्यात दोघंही यशस्वी ठरले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Violence: निकालानंतर कोलकात्यात थरार! टीएमसी कार्यालयावर बुलडोझर, रस्त्यांवर भीषण गोंधळ; VIDEO व्हायरल

Summer Breakfast Recipes: थंडाव्याचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल फ्रेश पुदिना पराठा

Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा माेठा निर्णय! राज्यात २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार..

Nira Canal Accident: नीरा कालव्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचवताना दोघे कालव्यात वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता, पोहता न आल्याने घात!

६५ वर्षांत २० मुख्यमंत्री बदलले, त्यातील फडणवीस यांनी सोलापूरच्या तरुणांना दिले ‘हे’ गिफ्ट; गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदा सुरु होणार ३ अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT