prashant 
मनोरंजन

प्रशांत दामले म्हणाले 'एक मत्त आनंदाची बातमी देणार’, चाहते गोंधळात

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेते प्रशांत दामले सोशल मिडियावर ब-याचदा ऍक्टीव्ह असतात. मात्र यावेळी प्रशांत दामले चर्चेत आले आहेत ते त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे. प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. दामले यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकी काय बातमी असणार याचा अंदाज चाहते बांधत आहेत. लवकरच एक आनंदाची बातमी मी देणार असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या पोस्टविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

प्रशांत दामले यांनी लिहिलंय, ‘लवकरच एक मत्त आनंदाची बातमी देणार आहे’. या पोस्टमधील ‘मत्त’ या शब्दाने सगळ्यांच लक्ष वेधलंय. हे वाचताना लहान मुलाच्या तोंडून बोबडे शब्द निघतात तसं जाणवतंय. नक्कीच बातमी मत्तच असणार, अशी कमेंट एकाने केली तर या वयात आनंदाची बातमी? असा गमतीशीर सवाल एकाने केला आहे. मराठी रंगभूमीवरील अतिशय उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्व आहात तुम्ही, असं कौतुकसुद्धा अनेकांनी केलंय तर काहींनी नवीन नाटक की परदेशी प्रयोग असा अंदाज बांधलाय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेकोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणा-या प्रशांत दामले यांचा राजभवनात सत्कार करण्यात आला होता. निर्माते तसंच सिनेसृष्टीतील अशा अनेक मदतीच्या हातांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

prashant damle says he will give good news to everyone netizens shocked 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT